IMPIMP

पदवीधर मतदारसंघ निवडणूक : पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे पटवर्धन, थोरात अन् गोरखे चर्चेत!

पिंपरी-चिंचवड –पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक आचारसंहिता सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा सामना या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून या निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

मात्र कोणत्याही परस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच असा चंग भाजपाने बांधला आहे. त्यामुळे पक्षाच्यावतीने पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील एका नेत्याला या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितली आहे. त्यादृष्टीने या नेत्यांनी मतदार नोंदणीची मोहीम जोरदारपणे राबवण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील भाजपाकडून लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आणि अण्णाभाउ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच, पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली आहे, अशी चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

चंद्रकांत पाटील यांना मिळालेले मंत्रिपद, मंत्रिमंडळामधील त्यांचे द्वितीय स्थान आणि राजकारणातील त्यांचा दबाव यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेमध्ये आली. तोपर्यंत ही निवडणूक उमेदवार आणि पक्षाचे काही ठराविक कार्यकर्ते वगळता फारशी चर्चेत नसायची. पुणे पदवीधर मतदार संघ हा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आला. 1990 ते 2002 पर्यंत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे पदवीधरचे आमदार होते. त्यांचा पराभव 2002 साली जनता दल, राष्ट्रवादी आणि डाव्या आघाडीचे उमेदवार शरद पाटील यांनी केला. पूर्वी ते मिरज विधानसभा मतदार संघातून आमदार होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील 2008 साली निवडणुकीला उभारले. कॉंग्रेसचे माणिक पाटील (चुयेकर), सातार्याचे राजेश वठारकर, शरद पाटील यांच्यात ही निवडणूक झाली. यामध्ये चंद्रकांतदादांच्या रूपाने भाजपने पुन्हा हा मतदारसंघ काबीज केला. त्यावेळी माणिक पाटील यांनी यंदा ‘पदवीधर आमदार कोल्हापुरचाच’ अशी प्रचाराची संकल्पना मांडली होती. झालेही तसेच पण माणिक पाटील यांच्या ऐवजी चंद्रकांत पाटील विजयी झाले.

चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदाच कोल्हापूरला पदवीधर आमदाराचा मान मिळाला. त्यानंतर पुन्हा 2014 साली चंद्रकांत पाटील निवडून आले. प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्ती म्हणून सचिन पटवर्धन यांची ओळख आहे. तसेच अमोल थोरात हे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून अमित गोरखे यांची ओळख आहे. परिणामी, शहर भाजपामध्ये पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच पटवर्धन, गोरखे आणि थोरात यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, उमेदवारीबाबत अधिकृतपणे कोणीही भूमिका अद्याप मांडलेली नाही.

Read Also :

‘या’ कारणामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांमध्ये मतभेद, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

सत्यजीत तांबेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडे केली ‘ही’ मागणी

सुजय‌ विखेंकडून पंतप्रधान,मुख्यमंत्र्यांसह बड्या नेत्यांना दिवाळीचे ‘हे’ खास गिफ्ट