मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता रोहित पवारांनी देखील क्रिकेटच्या मैदानात पाय ठेवले आहेत. त्यावरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी त्यांच्यावर खोचक टोला हाणला आहे.
“त्यामुळे काहींचं का आकाश पाताळ एक झालं”; अजित पवारांनी त्या वक्तव्यामुळे मागितली माफी
शरद पवार यांनी देखील राजकारणाच्या मैदानाव्यक्तीरिक्त क्रिकेटचं मैदान गाजवलं आहे. शरद पवार यांचं देशाच्या क्रिकेटमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यावरून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघुया. असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.
“नारायण राणे यांचं केंद्रातील केंद्रीय मंत्रीपद लवकरच जाणार”, मोठ्या नेत्याचं भाकित
तर खेळासाठी मी माझ्यापरीने काम करतच आहे. पण माझ्या आवडीच्या क्रिकेट या खेळासाठीही काम करण्याची खूप दिवसांची इच्छा होती. पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तशी संधी मिळाली. पवार साहेबांनी सर्वच खेळासाठी सह्याद्री इतकं मोठं काम केलं. ती उंची गाठणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शक्य नसंल तरी पवार साहेबांच्या रूपालीतल सह्याद्रीच्या शिखराकडं दीपस्तंभाप्रमाणे पाहुनच आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी खेळासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिल. रोहित पवारांनी म्हटलं.
खेळासाठी मी माझ्यापरीने काम करतच आहे पण माझ्या आवडीच्या क्रिकेट या खेळासाठीही काम करण्याची खूप दिवसांची इच्छा होती. आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या आशीर्वादामुळे #MCA च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून तशी संधी मिळाली. आदरणीय पवार साहेबांनी सर्वच खेळासाठी सह्याद्रीइतकं मोठं काम केलं. pic.twitter.com/yUBAh2TQMt
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 8, 2023
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 9, 2023
Read also
- लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या चैतन्यस्पर्श सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिला पुरुष भजन स्पर्धेचेही होतंय कौतुक
- “राणेंच्या बोलण्यात तथ्य, संजय राऊत असं अनेकदा बोललाय”; शिरसाठांनीही आगीत तेल ओतलं
- “राज्यात जो बोलेल त्याचा आवाज दाबला जात, त्यामुळे आम्ही आता ठरवलंय”
- “आयोग म्हणजे तुम्ही एकट्या नाहीत, हे लक्षात ठेवा”; चित्रा वाघ रूपाली चाकणकरांवर भडकल्या
- चित्रा वाघ आता गप्प का? त्यांचे तर कपडे सुद्धा..; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं