मुंबई : एक गोष्ट मी आज सर्वांना सांगतो की, एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे राऊतांन चपलीने मारतील. असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यावर आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
अजित पवारांच्या दौऱ्यांत सतर्क रहा, पोलिसांना गृहविभागाच्या सूचना
संजय शिरसाठ म्हणाले की, नारायण राणे ज बोलले त्यात सत्यता आहे. याबाबत आणखी माहिती हवी असेल तर जे आज मातोश्रीच्या अवतीभोवती फिरत आहेत ते सांगतील. संजय राऊत सार्वजनिक ठिकाणी उद्धव साहेब असे म्हणत असले तरी अनेक ठिकाणी अरे त्या उद्धवला काही कळतं का ? असे संजय राऊत अनेकवेळा बोललेले आहेत. अस संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
“ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही लघूशंका करण्याची परवानगी मिळते”
ते पुढे बोलताना म्हणाले की, हे लपून राहिलेले नाही. ही माझी शेवटची निवडणुक आहे. मला एकदा खासदार होऊ द्या. माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, असे संजय राऊत एकनाथ शिंदे यांना म्हणालेले आहेत. म्हणूनच नारायण राणे यांच्या बोलण्यात तथ्य आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.
“येत्या ८ ते १० दिवसात ठाकरे गटातील…”; उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा आणणारी बातमी
दरम्यान, संजय राऊत हा पळपुटा आहे म्हणून तो असं बोलतोय, कोण आहे हो संजय राऊत, तुम्ही नाव घेता कोण आहे. त्याचा पक्ष एवढा आहे, असं म्हणताना त्यांनी हाताच्या बोटांचा छोटासा भाग दाखविला. माझ्याकडं कात्रण आहेत. मी असा वाचून विसरणारा नाही. दखल घेणारा आहे. वाईट स्वभाव आहे माझा. वाक्य न वाक्य वाचतो, 26 डिसेंबरला अग्रलेख मी राखून ठेवला. संजय राऊतला सोडणार नाही. मी पण त्याच्यावर केस टाकेन. 100 दिवस तो आतमध्ये राहिला. त्याला वाटलं असेल कमी झाले आणखी जावं. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “राज्यात जो बोलेल त्याचा आवाज दाबला जात, त्यामुळे आम्ही आता ठरवलंय”
- “आयोग म्हणजे तुम्ही एकट्या नाहीत, हे लक्षात ठेवा”; चित्रा वाघ रूपाली चाकणकरांवर भडकल्या
- चित्रा वाघ आता गप्प का? त्यांचे तर कपडे सुद्धा..; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “त्यामुळे काहींचं का आकाश पाताळ एक झालं”; अजित पवारांनी त्या वक्तव्यामुळे मागितली माफी
- “नारायण राणे यांचं केंद्रातील केंद्रीय मंत्रीपद लवकरच जाणार”, मोठ्या नेत्याचं भाकित