पुणे : भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. शिवसेनेच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
यामिनी जाधव प्रकरण शिवसेनेला जड जाणार? महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली वाढल्या
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांवर जोरदार निशाणा साधला. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते, असे आशा बुचके यांनी प्रवेश केल्यानंतर सांगितले होते. त्याचा धागा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी टिप्पणी केली.
कोण आहेत आशाताई बुचके ?
आशाताई बुचके या वैष्णवधाम-बुचकेवाडी (ता. जुन्नर) येथील असून पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यावर आशाताई बुचके यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे नेतृत्वाची धुरा आली होती.
मुंबई महापालिकेत ‘आम्हीच’ येणार! सेनेच्या होमग्राऊंडवरून राणेंचा हल्लाबोल
२०१४ मध्ये आशाताईंनी शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र केवळ पाच हजार मतांच्या फरकाने त्यांना मनसेच्या शरद सोनावणेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०१९ मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले आणि त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. त्यानंतर बुचकेंनी अपक्ष निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती.
Read Also :
- ….त्यामुळेच भाजपने नेत्यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली, अब्दुल सत्तारांचा मोठा दावा
- २०१५ च्या निवडणुकीत अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंतकडून नारायण राणेंचे जंगी स्वागत
- “उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला…”, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल
- आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार; जन आशीर्वाद यात्रेत राणेंचा एल्गार
- आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन