मुंबई : शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका देऊन आयकर विभागाने त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
“बाळासाहेब आज हवे होते, म्हणाले असते…” नारायण राणेंनी व्यक्त केल्या भावना
या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना वेग आला असून, जाधव प्रकरण पुढे येताच बुधवारी सायंकाळी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केल्याचे समजते आहे. आयकर विभागाच्या कार्यवाहीनंतर जाधव यांच्याविरोधात या घडामोडी घडत असल्याने, हे प्रकरण शिवसेनेला जड जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिकेत ‘आम्हीच’ येणार! सेनेच्या होमग्राऊंडवरून राणेंचा हल्लाबोल
दुसरीकडे यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात आम्ही योग्य माहिती दिली आहे. संबंधित यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे. बदनामीच्या उद्देशाने खोटे आरोप केले जात असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
२०१५ च्या निवडणुकीत अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंतकडून नारायण राणेंचे जंगी स्वागत
२०१९ च्या निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी आपल्याकडे ७.५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. यामध्ये २.७४ कोटींची जंगम मालमत्ता असल्याचं नमूद केलं होतं. तर पती यशवंत जाधव यांच्या नावावर ४.५९ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. यामध्ये १.७२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जाधव यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या वारीस पठाण यांचा पराभव केला होता.
Read Also :
- “उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला…”, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल
- आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार; जन आशीर्वाद यात्रेत राणेंचा एल्गार
- आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
- …अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात