मुंबई : औरंगाबाद याठिकाणी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देणे आवश्यक आहे. मुस्कटदाबी करता कामा नये, असुदुद्दीन ओवेसे यांच्या सभेसाठी परवानगी देता मग राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी का देत नाही ? असा खडाबोल सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला केला आहे.
शिवसेनेच्या वाटेला गेलात तर.. वाघाची नखं अजूनही धारदार आहेत; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यांना इशारा
त्याचबरोबर त्यांनी मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्यांबाबत देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. नवनवीत राणा यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. तसेच हनुमान चालिसा हे भाजपचे अभियान नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर भाजपच्या पोलखोल यात्रेवरील दगडफेक प्रकरणी युवासेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक झाली आहे. यात स्थानिक आमदार त्यांचे पुत्र आणि कन्या सहभागी असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला.
राज ठाकरेंना परवानगीची गरज नाही, परवानगी दिली नाही तर मोठी सभा होईल; चंद्रकांत पाटील
राज्यात भारनियमन सध्या सुरू आहे. त्याचं मुळे कारण म्हणजे राज्यातील कोळसा टंचाई आणि ढिसाळ नियोजन. 27 वीज निर्मिती संयंत्र बंद आहेत, किंवा देखभाल दुरूस्ती सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात देखभाल दुरूस्ती केली जात आहे. वीजेची मागणी कमी असताना ही कामं केली जातात. मात्र ऐन उन्हाळ्यात ही कामं सुरू आहे. फडणवीस सरकारच्या काळात भारनियमन केले नाही. राज्य सरकार केंद्र सरकारवर आरोप करीत आहे. केंद्र सरकार कोळसा देत नाही.असे खापर फोडले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
“तुझा उद्योग तात्काळ थांबव, नाहीतर…”; अमोल मिटकरींना भाजप नेत्याचा इशारा
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात राजकीय वातावरण विविध मुद्यामुळे गाजत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबई मोठा राडा होण्याची शक्यता आहे. त्याचच आता विरोधी पक्ष देखील सत्ताधारी पक्षाला विविध मुद्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Read also:
- “ती सिनेमातील लोक, त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही”; राणा दाम्पत्यांवर राऊतांची प्रतिक्रिया
- “वळसे पाटलांवर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं”; मुनगंटीवारांचा खोचक टोला
- “सुपारी घेऊन रावणांची तोंड मुंबईत फिरायला लागलीत”; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्यांना टोला
- राणा दाम्पत्य गनिमी कावा करत मातोश्रीवर पोहचणार का? मुंबईत कार्यकर्त्यांचा मोठा राडा
- राज ठाकरेंच्या सभेला हिंदू विश्व परिषद, बजरंग दलाचा पाठिंबा; तर राष्ट्रवादी, प्रहारसह अन्य 6 संघटनांचा विरोध