औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई ठाण्यातील सभेनंतर मनसेची आता 1 मे राजी औरंगाबाद येथे सभा होत आहे. परंतु या सभेला वंचित बहुजन आघाडींसह बच्चू कडू यांच्या प्रहारसह 5 संघटनांनी विरोध दर्शविला आहे. यांच्यासोबत आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील मनसेच्या औरंगाबाद येथील सभेला विरोध दर्शविला आहे. मात्र राज ठाकरे यांच्या सभेला आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांने देखील पाठिंबा दिला आहे.
“अरे धनु बाळा, थांबल्या का तुझ्या छातीतील कळा”; वंसत मोरेंचा धनंजय मुंडेंला टोला
औरंगाबादचे मनसे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी राज ठाकरे यांची 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी यांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असून सर्व संघटनांनी साहेबांच्या भूमिकेस पाठिंबा दिला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे विरोध होत असताना आता राज ठाकरे यांना काही संघटनांचा पाठिंबा देखील मिळत आहे. याबाबत भाजपने देखील आपली भूमिका मांडली आहे.
“मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत..;” रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
अजान मशिदीमध्येच ऐकु येईल अशा पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे. मनसेने देखील मागणी केली आहे. ते त्यांना विचारा. परंतु भाजपने देखील पहिल्यापासून भूमिका भोंग्यांबाबत भूमिका घेतली आहे. भोंग्यांचा त्रास इतरांना होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात हुकुमशाही आली. लोकशाही स्वांतत्र्यावर गदा आली. आणीबाणीच्या काळात ज्या पद्धतीची स्थिती झाली होती. त्याच पद्धतीने उद्यापासून तुमचा भोंगा देखील बंद होईल. असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिला.
“राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटणकरींनी जरा संभाळून”; मनसेचा राष्ट्रवादीला इशारा
दरम्यान, राज ठाकरे यांनी येत्या 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंग्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मशिदीसमोरच मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Read also:
- शिवसेनेच्या वाटेला गेलात तर.. वाघाची नखं अजूनही धारदार आहेत; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यांना इशारा
- राज ठाकरेंना परवानगीची गरज नाही, परवानगी दिली नाही तर मोठी सभा होईल; चंद्रकांत पाटील
- “तुझा उद्योग तात्काळ थांबव, नाहीतर…”; अमोल मिटकरींना भाजप नेत्याचा इशारा
- ..अन् अजित पवार भाजप नेते लक्ष्मण जगतापसाठी धावले रूग्णालयात! राज्यभरात एकच चर्चा
- “राज ठाकरे त्यांच्यासोबत होते, तेव्हा गुलुगुलु अन् आता खाजवायाला लागले”; फडणवीसांचा हल्लाबोल