मुंबई : राज ठाकरे यांनी अलिकडेच हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार लावून धरला आहे. विरोधी पक्ष भाजप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आडून सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण एक वेगळ्याच वळणांवर निघून गेलं आहे. याचाच धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला.
निवडणुकीमध्ये ज्यावेळी राज ठाकरे त्यांच्यासोबत होते. त्यांचे बोल त्यांना गुलुगुलु वाटत होते. गुदगुल्या होत होत्या. आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर आता त्यांना खाजवायाला होत आहे. यावरून राज ठाकरे यांचा घाव कुठेतरी वार्मी लागतो. भारतीय जनता पक्षाला कुणालाही समोर करायची गरज नाही. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. आम्ही सुरू केलेल्या पोलखोल यात्रेमुळे सरकार व्यस्थित झाले आहेत. त्य़ामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर रोज हल्ला सुरू आहे. परंतु यांनी कितीही हल्ला केला तरी आम्ही भ्रष्टाचाराचा पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
राज ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवणार! भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांचं वक्तव्य
भाजपने सत्ताधारी पक्षांच्या विरोधात मुंबईत पोलखोल यात्रा सुरू केलं आहे. त्याअंतर्गत भाजपच्या विविध नेत्यांच्या मुंबईत सभा होत असून मुंबई महापालिकेतील भ्रष्टचाराचा पोलखोल करीत आहेत. मागील काही दिवसांच्या भाजपच्या पोलखोल रथावर काही अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला. त्यावेळी त्याठिकाणी थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
“धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला..;”मनसे आमदार राजू पाटलांचा मुंडेंना टोला
दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीवरील भोंग्याबाबतची भूमिका दिवसेदिवस आक्रमक होत आहे. मनसेकडून् आता राज्यात सभांचा धुराळा उडवून दिला जात आहे. मुंबई, ठाणे त्यानंतर आता मनसेकडून औरंगाबाद येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती गोंधळाची होण्याची शक्यता आहे.
Read also:
- “अरे धनु बाळा, थांबल्या का तुझ्या छातीतील कळा”; वंसत मोरेंचा धनंजय मुंडेंला टोला
- “मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत..;” रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
- “राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटणकरींनी जरा संभाळून”; मनसेचा राष्ट्रवादीला इशारा
- शिवसेनेने दिलेले चॅलेंज राणा दाम्पत्य पुर्ण करणार? कार्यकर्त्यांशी प्रंचड गर्दी होण्याची शक्यता
- मंदिरात सीसीटिव्ही लावले आहेत, मशिदीत आहेत का? मनसेच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांकडून जोरदार प्रत्युत्तर