मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यावेळी राज ठाकरे यांना अर्धवटरावांची उपमा दिली आहे. पुर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुलींचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सूरू आहे. अर्थवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्थवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे, आणि आता एकदा सीडी घुसली त्यामुळे अर्थवटराव शांत झाले. अशी मिश्किल शब्दात धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर मनसेकडून देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
“ऑम्लिपिकमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली तर शिवसेना गोल्ड मेडल आणेल”
मनसे नेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेव्हा चड्डीत राहायचं काय समजलं? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
मुंडेंकडून ‘अर्धवटराव’ तर मिटकरींकडून राज ठाकरेंचा ‘खाजसाहेब’ उल्लेख; राजकारण तापलं
तसेच हनुमान चालिसा भोंग्यावर लावणाऱ्यांना स्वत:ला तरी हनुमान चालीसा येते का? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना केला आहे. पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाईमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय डोकं आणि त्यात मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं. असा टोला देखील त्यांनी लगावला.
गुणरत्ने सदावर्तेंवर आता सोलापुरात गुन्हा दाखल! अकोला पोलीसही ताबा घेण्याच्या तयारीत ?
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर महासभेत राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जोरदार प्रहार केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून मनसेवर जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून संवाद सभेचं आयोजन केलं जात आहे. काल इस्मालापूर सभेत राष्ट्रवादी काॅंग्रसकडून टिका करण्यात आली आहे.
Read also:
- शिवसेनेने दिलेले चॅलेंज राणा दाम्पत्य पुर्ण करणार? कार्यकर्त्यांशी प्रंचड गर्दी होण्याची शक्यता
- मंदिरात सीसीटिव्ही लावले आहेत, मशिदीत आहेत का? मनसेच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांकडून जोरदार प्रत्युत्तर
- “राजू शेट्टींना काही अडचण होती तर त्यांनी..”; राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- राज ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवणार! भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांचं वक्तव्य
- “धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला..;”मनसे आमदार राजू पाटलांचा मुंडेंना टोला