अमरावती : मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसाचं पठण करावं. अन्य़था आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसांच पठण करणार, असा इशादा आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर रवी राणांच्या विरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यांना मातोश्रीवर येण्यांचं आव्हानं केलं होतं. त्यानंतर रवी राणा यांनी हे चॅलेज स्वीकारलं असून लवकरच ते मातोश्रीवर जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुंडेंकडून ‘अर्धवटराव’ तर मिटकरींकडून राज ठाकरेंचा ‘खाजसाहेब’ उल्लेख; राजकारण तापलं
आज झालेल्या पत्रकार परिषेद रवी राणा यांनी म्हटलं आहे की, आम्ही विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला जाणार आहोत. येत्या 22 एप्रिल ला मातोश्रीवर जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्यासोबत खासदार नवनवीत राणा हे देखील जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
गुणरत्ने सदावर्तेंवर आता सोलापुरात गुन्हा दाखल! अकोला पोलीसही ताबा घेण्याच्या तयारीत?
आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हनुमान जयंती दिवशी अमरावती शहरातील अकोली परिसरातील वीर आज हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर रवी राणा यांनी पुजा अर्चा केली. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि त्यांच्या समर्थकांनी मंदिरात बसून हनुमान चालिसा पठणास सुरूवात केली. तब्बल अर्धा पाऊण तास त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केलं त्यावेळी त्या दोघांनाही एकुण 40 वेळा हनुमान चालिसाचं पठण केलं.
गुणरत्ने सदावर्तेंना अखेर जामीन मंजूर! सातारा जिल्हा न्यायालय सुनावणीत
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसाचं पठण करावं. अन्य़था आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसांच पठण करणार आहेत. महाराष्ट्राला लागलेली साडेसाती दुर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी रामराज्यासारखं वागावं असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read also:
- मंदिरात सीसीटिव्ही लावले आहेत, मशिदीत आहेत का? मनसेच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांकडून जोरदार प्रत्युत्तर
- “राजू शेट्टींना काही अडचण होती तर त्यांनी..”; राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- राज ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवणार! भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांचं वक्तव्य
- “धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला..;”मनसे आमदार राजू पाटलांचा मुंडेंना टोला
- “ऑम्लिपिकमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली तर शिवसेना गोल्ड मेडल आणेल”