पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिकेचं राजकीय वातावरण तयार करण्यात आलं आहे. त्यावरून राज्यात सध्या राजकीय नेते एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताहेत. मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा या विषयाला महत्व देत राजकीय नेते महागाई, इंधनदरवाढ इत्यादी समस्यांकडे कानडोळा करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहेत.
“धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला..;”मनसे आमदार राजू पाटलांचा मुंडेंना टोला
रोहित पवार म्हणाले की, मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळं बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधं यांसाठी हातात हात घालून लढत होतो. म्हणून माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“ऑम्लिपिकमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली तर शिवसेना गोल्ड मेडल आणेल”
कुणाला वाटंत असेल ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल किंवा काहींना वाटंत असेल आपली राजकीय भाकरी भाजेल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसं होऊ देणार नाही. फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आव्हान देखील त्यांनी राजकीय पक्षांना केलं आहे.
मुंडेंकडून ‘अर्धवटराव’ तर मिटकरींकडून राज ठाकरेंचा ‘खाजसाहेब’ उल्लेख; राजकारण तापलं
दरम्यान, राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस हा राजकीय संघर्ष सध्या वाढतच चालला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांकडून दिवसेंदिवस मनसेवर शाब्दिक हल्ला चढवला जात आहे. तर मनसेकडून देखील त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिला जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलाचं तापलं आहे.
Read also:
- “राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटणकरींनी जरा संभाळून”; मनसेचा राष्ट्रवादीला इशारा
- शिवसेनेने दिलेले चॅलेंज राणा दाम्पत्य पुर्ण करणार? कार्यकर्त्यांशी प्रंचड गर्दी होण्याची शक्यता
- मंदिरात सीसीटिव्ही लावले आहेत, मशिदीत आहेत का? मनसेच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांकडून जोरदार प्रत्युत्तर
- “राजू शेट्टींना काही अडचण होती तर त्यांनी..”; राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- राज ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवणार! भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांचं वक्तव्य