मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यावेळी राज ठाकरे यांना अर्धवटरावांची उपमा दिली आहे. पुर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुलींचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सूरू आहे. अर्थवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्थवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे, आणि आता एकदा सीडी घुसली त्यामुळे अर्थवटराव शांत झाले. अशी मिश्किल शब्दात धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर मनसेकडून देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
राज ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवणार! भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांचं वक्तव्य
मनसे नेते वसंत मोरे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधताना टिका केली आहे. त्याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अरे धनु बाळा… थांबल्या का तुझ्या छातीतील कळा. तसेच धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला झालेल्या धनुर्वातातून तर ही प्रतिक्रिया आली नाही ना ? तुमच्या बुडाखाली काय जळतंय व टोचतंय याची कल्पना आहे आम्हाला. त्यामुळे तुमच्या वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते, असा टोला मनसे आमदार राजू पाटलांनी हाणला आहे.
“धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला..;”मनसे आमदार राजू पाटलांचा मुंडेंना टोला
तसेच हनुमान चालिसा भोंग्यावर लावणाऱ्यांना स्वत:ला तरी हनुमान चालीसा येते का? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना केला आहे. पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाईमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय डोकं आणि त्यात मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“ऑम्लिपिकमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली तर शिवसेना गोल्ड मेडल आणेल”
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर महासभेत राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जोरदार प्रहार केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून मनसेवर जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून संवाद सभेचं आयोजन केलं जात आहे. काल इस्मालापूर सभेत राष्ट्रवादी काॅंग्रसकडून टिका करण्यात आली आहे.
Read also:
- “मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत..;” रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
- “राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटणकरींनी जरा संभाळून”; मनसेचा राष्ट्रवादीला इशारा
- शिवसेनेने दिलेले चॅलेंज राणा दाम्पत्य पुर्ण करणार? कार्यकर्त्यांशी प्रंचड गर्दी होण्याची शक्यता
- मंदिरात सीसीटिव्ही लावले आहेत, मशिदीत आहेत का? मनसेच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांकडून जोरदार प्रत्युत्तर
- “राजू शेट्टींना काही अडचण होती तर त्यांनी..”; राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया