मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापूर्वी भोंग्यांचं राजकारण जोरदार सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे येत्या 3 मे पर्यंत खाली उतरवण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चॅलेज देऊन मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचं म्हटलं. त्यासाठी त्या मुंबईत देखील दाखल झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत..;” रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
राणा दाम्पत्यांना उद्देशून बोलताना बच्चू कडू म्हणाले की, खरं राणा दाम्पत्यांनी जे शिवसैनिकांना चॅलेंज दिलं आहे. ते अतिशय मुर्खपणा आहे. कोणते मुद्दे घ्यावेत यांचं कोणतंही भान राणांना राहिलेलं दिसत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे. शिवसेनेने जे आव्हान दिलं आहे. त्यामध्ये आम्ही देखील त्यांच्यासोबत असतील असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
“राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटणकरींनी जरा संभाळून”; मनसेचा राष्ट्रवादीला इशारा
आमच्या जिल्ह्याचे ते खासदार, आमदार आहेत. त्यांचा अपमान होऊ नये असं आम्हाला वाटतं. सामान्य माणसाशी संबंध नसलेले मुद्दे घेऊन आपला अपमान करण्याच्या सोयीने ते जात आहेत. उलट निवडून राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत. ही मतदारासोबत फार मोठी बेईमानी असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी त्यांच्यावर केली आहे. शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही, वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
शिवसेनेने दिलेले चॅलेंज राणा दाम्पत्य पुर्ण करणार? कार्यकर्त्यांशी प्रंचड गर्दी होण्याची शक्यता
दरम्यान, रवी राणा यांनी अलिकडेच मुख्यमंत्री यांना मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करण्याचा सल्ला दिला होता. यात खासदार नवनवीत राणा यांनी देखील देशातील साडेसाती दुर करण्यासाठी आम्ही मातोश्रीवर जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नवनवीत राणांसह रवी राणा काल मुंबईत दाखल झाले असून मोठा राडा होण्याची यावेळी शक्यता आहे.
Read also:
- राज ठाकरेंना परवानगीची गरज नाही, परवानगी दिली नाही तर मोठी सभा होईल; चंद्रकांत पाटील
- “तुझा उद्योग तात्काळ थांबव, नाहीतर…”; अमोल मिटकरींना भाजप नेत्याचा इशारा
- ..अन् अजित पवार भाजप नेते लक्ष्मण जगतापसाठी धावले रूग्णालयात! राज्यभरात एकच चर्चा
- “राज ठाकरे त्यांच्यासोबत होते, तेव्हा गुलुगुलु अन् आता खाजवायाला लागले”; फडणवीसांचा हल्लाबोल
- “अरे धनु बाळा, थांबल्या का तुझ्या छातीतील कळा”; वंसत मोरेंचा धनंजय मुंडेंला टोला