पुणे : पिंपरी-चिचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप एका खासजी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी शहरातील भाजपचे प्रमुख नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील रूग्णालयात जाऊन लक्ष्मण जगताप यांच्या तब्येतीची चौकशी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून लक्ष्मण जगताप यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी लक्ष्मण जगताप यांच्या उपचारासाठी अजित पवारांनी घेतलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
लक्ष्मण जगताप यांच्या उपचारासाठी इंजेक्शन अमेरिकेवरून आणण्याची गरज होती. त्यावर तात्काळ निर्णय घेत अजित पवारांनी राजकारणातील विरोध-प्रतिरोध बाजूला ठेवून आपुलकीच्या भावनेने इंजेक्शनसाठी प्रयत्न केले. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री नितीन गडकरी आणि राज्य केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे अजित पवारांच्या या भूमिकेमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
लक्ष्मण जगताप हे एकेकाळी अजित पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. परंतु राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा सहकारी राहत नसतो. त्याप्रमाणे लक्ष्मण जगताप 2014 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु हाच जुना सहकारी आजारी असल्याचं अजित पवारांना समजलं त्यावेळी त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम बाजूला ठेवत थेट रूग्णालय गाठलं.
राज ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवणार! भोंग्यांबाबत गृहमंत्र्यांचं वक्तव्य
दरम्यान, पिंपरी-चिंचवड या शहरात राजकारणातील एक महत्वाचा नेता म्हणून लक्ष्मण जगताप यांची सध्या ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ज्युपीटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी रूग्णालयात भाजपसह स्वकीयांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
Read also:
- “राज ठाकरे त्यांच्यासोबत होते, तेव्हा गुलुगुलु अन् आता खाजवायाला लागले”; फडणवीसांचा हल्लाबोल
- “अरे धनु बाळा, थांबल्या का तुझ्या छातीतील कळा”; वंसत मोरेंचा धनंजय मुंडेंला टोला
- “मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत..;” रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
- “राष्ट्रवादीच्या गॅसवर तयार झालेल्या मटणकरींनी जरा संभाळून”; मनसेचा राष्ट्रवादीला इशारा
- शिवसेनेने दिलेले चॅलेंज राणा दाम्पत्य पुर्ण करणार? कार्यकर्त्यांशी प्रंचड गर्दी होण्याची शक्यता