मुंबई : बुधवारी राज्यात अलिकडेच राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र पुढील 12 तासांत काही अधिकाऱ्यांच्या बदलीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. राज्य सरकारच्या यो गोंधळलेल्या परिस्थितीवर भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी कडाडून विरोध करीत प्रखर शब्दांत टीका केली आहे.
“तुझा उद्योग तात्काळ थांबव, नाहीतर…”; अमोल मिटकरींना भाजप नेत्याचा इशारा
पदव्यांमध्ये पसंती नापसंतीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. पोलिस दलाच्या बदल्या कशा कराव्यात यासंदर्भात काही निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार पोलिस महासंचालकांचा अधिकार आहे. हा एकनाथ शिंदे यांचा अधिकार नाही आहे. कोणत्या आमदारांना विचारून तुम्ही पोलीस दलांच्या बदल्या करीत आहेत. असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
..अन् अजित पवार भाजप नेते लक्ष्मण जगतापसाठी धावले रूग्णालयात! राज्यभरात एकच चर्चा
तुमच्या मनाने पोलीस अधिकारी दिले नाहीत आणि चांगले पोलीस अधिकारी या भागात आले तर आपण अडचणीत येऊ जर या भावनेने हे काम होत असेल तर गृहमंत्र्यांच्या भागात ज्योतिरलिंग आहेत. त्यांना मोठी शक्ती मिळो. गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांच्या काही दवाब असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं, असा इशारा देखील त्यांनी केला आहे.
“राज ठाकरे त्यांच्यासोबत होते, तेव्हा गुलुगुलु अन् आता खाजवायाला लागले”; फडणवीसांचा हल्लाबोल
दरम्यान, राज्य सरकारने अलिकडेच जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकापडकी बदल्या केल्या आहेत. पिंपरी चिंचवडचे धडाकेबाज पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांची देखील बदली केली आहेत. त्यांना राज्याच्या व्हिआयपी विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर पिपंरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यात गोंधळ सुरू झाला आहे.
Read also:
- “सुपारी घेऊन रावणांची तोंड मुंबईत फिरायला लागलीत”; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्यांना टोला
- राणा दाम्पत्य गनिमी कावा करत मातोश्रीवर पोहचणार का? मुंबईत कार्यकर्त्यांचा मोठा राडा
- राज ठाकरेंच्या सभेला हिंदू विश्व परिषद, बजरंग दलाचा पाठिंबा; तर राष्ट्रवादी, प्रहारसह अन्य 6 संघटनांचा विरोध
- शिवसेनेच्या वाटेला गेलात तर.. वाघाची नखं अजूनही धारदार आहेत; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यांना इशारा
- राज ठाकरेंना परवानगीची गरज नाही, परवानगी दिली नाही तर मोठी सभा होईल; चंद्रकांत पाटील