मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनवीत राणा आणि रवी राणा शिवसैनिकांनी दिलेले चॅंलेज पुर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र सध्या मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच राणा दाम्पत्यं ज्याठिकाणी थांबले आहेत. त्याठिकाणी देखील शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत त्या निवासस्थानाला वेढा घालून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. याचाच धागा प कडत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
..अन् अजित पवार भाजप नेते लक्ष्मण जगतापसाठी धावले रूग्णालयात! राज्यभरात एकच चर्चा
शिवसैनिकांची माथी भडकावयाची, त्यांनी चुकीची पावलं उचलावी, शिवसैनिकांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना तुरूंगात टाकयाचं, हा गनिमी कावा असून त्याचा मातोश्रीवर येण्याचा हट्टहास आहे. असा निंदणीय प्रकार राणा दाम्पत्य करीत आहे. या दाम्पत्यांचा बुड नाही, शेंडा नाही, दुसऱ्याच्या जीवावर उडणारं दाम्पत्य आहे. अशी प्रखर टीका त्यांनी केली आहे.
“राज ठाकरे त्यांच्यासोबत होते, तेव्हा गुलुगुलु अन् आता खाजवायाला लागले”; फडणवीसांचा हल्लाबोल
हिंदुत्व आमच्या रक्तात असून तुम्ही आम्हांला काय हिंदुत्व शिकवणार? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. सुपारी घेऊन रावणांची तोंड या मुंबईत फिरायला लागलीत आहेत. परंतु मुंबई आणि महाराष्ट्राची जनता समजून आहे की, भविष्य आपल्याला केवढ्या मोठ्या संकटांना समोरं जावं लागणार आहे. ज्याठिकाणी भाजपची सत्ता नाही आहे. त्याठिकाणी हे दाम्पत्यं भ्रमंती करणार आहेत आणि बरळून बरळून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
“अरे धनु बाळा, थांबल्या का तुझ्या छातीतील कळा”; वंसत मोरेंचा धनंजय मुंडेंला टोला
दरम्यान, रवी राणा यांनी अलिकडेच आम्ही 22 तारखेला मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करण्यासाठी येत आहोत. असं म्हटलं होतं. त्यावर शिवसैनिकांनी त्यांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलं होतं. राणा दाम्पत्यं मुंबई विदर्भ एक्सप्रेसने येणार होते. त्यामुळे सकाळपासून शिवसैनिकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. मात्र राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखल झालेत.
Read also:
- राणा दाम्पत्य गनिमी कावा करत मातोश्रीवर पोहचणार का? मुंबईत कार्यकर्त्यांचा मोठा राडा
- राज ठाकरेंच्या सभेला हिंदू विश्व परिषद, बजरंग दलाचा पाठिंबा; तर राष्ट्रवादी, प्रहारसह अन्य 6 संघटनांचा विरोध
- शिवसेनेच्या वाटेला गेलात तर.. वाघाची नखं अजूनही धारदार आहेत; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यांना इशारा
- राज ठाकरेंना परवानगीची गरज नाही, परवानगी दिली नाही तर मोठी सभा होईल; चंद्रकांत पाटील
- “तुझा उद्योग तात्काळ थांबव, नाहीतर…”; अमोल मिटकरींना भाजप नेत्याचा इशारा