मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनवीत राणा आणि रवी राणा शिवसैनिकांनी दिलेले चॅंलेज पुर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र सध्या मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच राणा दाम्पत्यं ज्याठिकाणी थांबले आहेत. त्याठिकाणी देखील शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत त्या निवासस्थानाला वेढा घालून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
“राज ठाकरे त्यांच्यासोबत होते, तेव्हा गुलुगुलु अन् आता खाजवायाला लागले”; फडणवीसांचा हल्लाबोल
रवी राणा यांनी अलिकडेच आम्ही 22 तारखेला मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करण्यासाठी येत आहोत. असं म्हटलं होतं. त्यावर शिवसैनिकांनी त्यांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलं होतं. राणा दाम्पत्यं मुंबई विदर्भ एक्सप्रेसने येणार होते. त्यामुळे सकाळपासून शिवसैनिकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. मात्र राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखल झालेत.
“अरे धनु बाळा, थांबल्या का तुझ्या छातीतील कळा”; वंसत मोरेंचा धनंजय मुंडेंला टोला
मुंबईत दाखल झाल्यानंतर जवळील नंदादीप गेस्टहाऊसवर नवनवीत राणा आणि रवी राणा हे थांबले असल्याची माहिती समजताच शिवसैनिकांनी त्या गेस्टहाऊसला घेराव घातला. त्यासाठी सध्या शिवसैनिकांची रावी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे या प्रचंड गर्दीतून गनिमा कावा करून रवी राणा आणि नवनीत राणा मातोश्रीवर पोहचणार का ? ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत..;” रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
दरम्यान, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्यावर टिका करताना म्हणाल्या की, ज्या व्यक्तींन संरक्षण हवं आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांवर बोला. त्यांच्यावर टिका करा आणि वाय दर्जाची सुरक्षा मिळवा. अशी योजना सध्या सुरू आहे. असं म्हटलं आहे. तर बच्चू कडू यांनी देखील राणा दाम्पत्यांना इशारा देत शिवसेनेच्या नादाला लागू नका असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या मुंबईत कशा पद्धतीच्या घडामोडी घडणार त्याकडे लक्ष आहे.
Read also:
- राज ठाकरेंच्या सभेला हिंदू विश्व परिषद, बजरंग दलाचा पाठिंबा; तर राष्ट्रवादी, प्रहारसह अन्य 6 संघटनांचा विरोध
- शिवसेनेच्या वाटेला गेलात तर.. वाघाची नखं अजूनही धारदार आहेत; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यांना इशारा
- राज ठाकरेंना परवानगीची गरज नाही, परवानगी दिली नाही तर मोठी सभा होईल; चंद्रकांत पाटील
- “तुझा उद्योग तात्काळ थांबव, नाहीतर…”; अमोल मिटकरींना भाजप नेत्याचा इशारा
- ..अन् अजित पवार भाजप नेते लक्ष्मण जगतापसाठी धावले रूग्णालयात! राज्यभरात एकच चर्चा