मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनवीत राणा आणि रवी राणा शिवसैनिकांनी दिलेले चॅंलेज पुर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र सध्या मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच राणा दाम्पत्यं ज्याठिकाणी थांबले आहेत. त्याठिकाणी देखील शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत त्या निवासस्थानाला वेढा घालून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या येण्यानं काहीही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे.
राज ठाकरेंना परवानगीची गरज नाही, परवानगी दिली नाही तर मोठी सभा होईल; चंद्रकांत पाटील
ती सिनेमातील लोक आहेत. त्यांना स्टंटबाजीचा अनुभव आहे. मात्र त्यांच्या स्टंटबाजीने कोणताही फरक पडणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यांना लगावला आहे. त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही. त्यांना काय करायचे आहे ते करू द्या. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. असंही संजय राऊत म्हणाले.
“तुझा उद्योग तात्काळ थांबव, नाहीतर…”; अमोल मिटकरींना भाजप नेत्याचा इशारा
हनुमान चालिसा वाचणे हा श्रद्धेचा विषय आहे. नौटंकी किंवा स्टंटचा नव्हे. परंतु भाजपने हिंदुत्वाची नौटंकी करून ठेवली आहे. नवनवीत राणा आणि रवी राणा ही याच नौटंकीमधील पात्र आहेत. परंतु भाजपच्या हिंदुत्वाच्या नौटंकीला जनता गांभीर्याने घेत नाही. हनुमान जयंती आणि रामनवमी हे सण आम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मुंबईत साजरे करतो. त्यामुळे आम्हाला भाजपने शिकवू नये, असा इशारा देखील संजय राऊतांनी भाजपला दिला.
..अन् अजित पवार भाजप नेते लक्ष्मण जगतापसाठी धावले रूग्णालयात! राज्यभरात एकच चर्चा
दरम्यान, रवी राणा यांनी अलिकडेच आम्ही 22 तारखेला मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करण्यासाठी येत आहोत. असं म्हटलं होतं. त्यावर शिवसैनिकांनी त्यांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलं होतं. राणा दाम्पत्यं मुंबई विदर्भ एक्सप्रेसने येणार होते. त्यामुळे सकाळपासून शिवसैनिकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. मात्र राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखल झालेत.
Read also:
- “वळसे पाटलांवर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं”; मुनगंटीवारांचा खोचक टोला
- “सुपारी घेऊन रावणांची तोंड मुंबईत फिरायला लागलीत”; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्यांना टोला
- राणा दाम्पत्य गनिमी कावा करत मातोश्रीवर पोहचणार का? मुंबईत कार्यकर्त्यांचा मोठा राडा
- राज ठाकरेंच्या सभेला हिंदू विश्व परिषद, बजरंग दलाचा पाठिंबा; तर राष्ट्रवादी, प्रहारसह अन्य 6 संघटनांचा विरोध
- शिवसेनेच्या वाटेला गेलात तर.. वाघाची नखं अजूनही धारदार आहेत; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यांना इशारा