मुंबई : मागील काही वर्षापासून भाजप आणि शिवसेनेत मोठे वाद होत आहेत. यातच भाजपचे नेते किरीट सोमय्या आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करीत आहेत. खास करून भाजपचे नेते शिवसेनेच्या नेत्यांवर कडाडून टिका करतांना दिसत आहेत. मात्र हे सर्व राजकारण सोडून आज किरीट सोमय्या अन् किशोरी पेडणेकर एकाच कार्यक्रमात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
राजकारण तापणार…! भाजपचं माफी मांगो आंदोलन तर आघाडीचा हल्लाबोल
किरीट सोमय्यांनी सातत्याने मुंबई भ्रष्टाचारावरून किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून किशोरी पेडणेकरांनी देखील किरीट सोमय्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. कधी कधी तर दोन्ही बाजूंच्या नेत्यांची बोलण्याची आक्रमक शैलीने राजकारणाची पातळी देखील कसरतांना दिसते. परंतु हे सर्व विसरून किरीट सोमय्या आणि किशोरी पेडणेकरांनी एकाच कार्यक्रमात हजेरी लावली.
“गुजरात जिंकल्याने भाजपचा हेतू साध्य, आता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राला द्या”
मुंबईतील एका कार्यक्रमात किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. त्यानंतर किरीट सोमय्या देखील त्या कार्यक्रमात आले. किरीट सोमय्यांनी कार्यक्रमात आल्यानंतर त्यांनी थेट किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. त्यावेळी किरीट सोमय्या यांचा निल सोमय्या देखील उपस्थित होता. यावेळी किशोरी पेडणेकर यांच्या पाया निल सोमय्या देखील पडले. तसेच यावेळी नील बेटा, कसा आहेस? अशी विचारणा देखील पेडणेकरांनी केली.
हल्लाबोल…! महामोर्चाची जोरदार तयारी, टी-शर्ट, बॅनर, अन् आज धमाकेदार टिजर रिलीज
दरम्यान, एका बाजूला अरेतुरी करून एकमेकांवर आगपाखड करायची अन् दुसऱ्या बाजूला अशा कार्यक्रमातून भेटायचं आणि आंनदाच्या वातावरणात वावरायचं. लोकांना वेगळं दाखवायचं अन् करायचं वेगळं. अशी भूमिका घेतल्याने अनेकांनी यावर संताप प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
Read also
- #हल्लाबोल…! महामोर्चात रंगीबेरंगी झेंड्यांचा सहभाग, भगवे, निळे, लाल, किती रंगाचे झेंडे
- हल्लाबोल..! आघाडीच्या महामोर्चात वाचाळवीरांचा रावण दहन होणार..?
- “एकांनी चुक केली तर आपण ती मान्य करू, परंतु..; ” सुप्रिया सुळेंचा मोर्चात हल्लाबोल
- “शिंदे सरकारचं महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली चिरडलंय, त्यांनी आमच्या मोर्चात सामील व्हावं”; संजय राऊत
- “महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी…!” म्हणाले, कृपया वस्तुस्थिती…;