मुंबई : अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर अखेर पोलिसांनी महाविकास आघाडीच्या उद्यो होणाऱ्या मोर्चाला परवानगी दिली आहे. परंतु या मोर्चासाठी पोलिसांनी महाविकास आघाडीसमोर काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. त्या अटीशर्तीचं पालनं करणं महाविकास आघाडीला आवश्यक असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यात मोर्चा काढण्याच्या आधी काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मोर्चात सहभागी होणार नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
“वारकऱ्यांनो सावध रहा..! वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज”
महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पुर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येथे पुर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी. असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
“मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबईतील कुडास कंपनीपासून ते टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत मोर्चाला परवानगी दिली आहे. तर या मोर्चासाठी राज्यातील तब्बल अडीच हजार पोलीस तैन्यात करण्यात येणार आहे. तसेच महाविकास आघाडीकडून या मोर्चासाठी खास टी-शर्ट छापण्यात आले असून समोर महाविकास आघाडीचा महामोर्चा तर पाठीमागे हॅशटॅग हल्लाबोल असं टि-शर्टवर छापण्यात आलं आहे. यातच कुडास कंपनीजवळ महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाहणी देखील करण्यात आली आहे.
“पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला तब्बल 14 अटी घालण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने संजय राऊत माफी मांगो आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे उद्या महाविकास आघाडी आणि भाजपचे आमनेसामने येण्याची शक्यता असून त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- राजकारण तापणार…! भाजपचं माफी मांगो आंदोलन तर आघाडीचा हल्लाबोल
- “गुजरात जिंकल्याने भाजपचा हेतू साध्य, आता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राला द्या”
- हल्लाबोल…! महामोर्चाची जोरदार तयारी, टी-शर्ट, बॅनर, अन् आज धमाकेदार टिजर रिलीज
- “मनुस्मृति जागी झाली अन् हे पुन्हा एकदा पिसाळले”; अंधारेंच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचा भाजपवर घणाघात
- “त्याचे काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना दिसेल,” मेहबुब शेखांचा चित्रा वाघ यांच्यावर सुचक वक्तव्य