मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये सुषमा अंधारे साधु संत- हिंदू देवतांवर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. यावरून राज्यात एक मोठा वाद निर्माण झाला आहे. तर वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून यामध्ये भाजपचे आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले वारकऱ्यांना चिथवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी तुषार भोसले आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
“वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलंय, सावध रहा;” रूपाली पाटलांचा घणाघात
आमच्या हिंदू-देवतांवर आणि संत परंपरेवर टीका करणाऱ्यांना पक्ष भाड्याने चालवायला दिला की काय परिणाम होतो. हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल. देवी-देवतांचा आणि संतांचा अपमान करणारे आज पक्षाचे प्रवक्ते म्हणून राज्यभर भटकत आहेत. तसेच आमच्या देवी-देवतांवर गरळ ओकत आहेत. अशी टिका तुषार भोसले यांनी सुषमा अंधारे आणि शिवसेनेवर केली आहे.
“मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
तुषार भोसले यांच्या टिकेला अनेकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज आहे. हा धुर्त, ढोंगी वारकरी संप्रदायाला धुळीस मिळवण्याचे काम करत आहे. वारकऱ्यांनो सावध रहा..! संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवणाऱ्यांचे वारसदार आहेत. असंही रविकांत वरपे यांनी इशारा दिला आहे.
“पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
दरम्यान, वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलं आहे. ते स्वत: ला वारकरी समजतात, पण ते वारकरी नाही आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाला कुठेतरी गालबोट लागत आहे. भाजपच्या चोरट्या, अविचारी आणि धुर्त राजकारणी या लोकांना कोणीही आपल्या क्षेत्रात घेऊ नका. हे आपल्या क्षेत्राचं वाटोळं करून, माता बहिणींमध्ये झुंज लावण्याचं काम करतात. असं राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हटलंय.
वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज आहे.
हा धूर्त,ढोंगी वारकरी संप्रदायाला धुळीस मिळवण्याचे काम करत आहे. वारकऱ्यांनो सावध रहा! संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवणाऱ्यांचे वारसदार आहेत..! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @AcharyaBhosale @TV9Marathi @3kmIndia— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) December 15, 2022
Read also
- “मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार, पण….”; राजीनामा द्यायच्या आधी अंधारेंचा भाजपला इशारा
- “अडीच वर्ष राज्याचा विकास थांबला, आता विकासाची गंगा वाहणार”; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
- “निवडणुका लागल्या की, ज्यांची फाडायची त्यांची फाडीन”; राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा
- “मुंबईच्या सकाळच्या भोंग्याचे नाशिककर बारा वाजवणार.!” 12 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
- “खिंडारवाल्या पक्षाला अजून किती खिंडार पाडायचं”; अब्दुल सत्तारांनी ठाकरेंना डिवचलं