मुंबई : साधु संत आणि हिंदु-देवतांबाबत वादग्रस्त वक्तव्य असलेले जुने व्हिडीओ शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे सध्या व्हायरल होत आहेत. त्यावरून वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यावर आता सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
माझ्यासाठी माझा पक्ष महत्वाचा आहे. मला पक्षासाठी काम करायचं असेल तर मी कुठूनही काम करू शकते. मी जर पक्षाबाहेरन काम केलं तर भाजपसाठी पळता भुई थोडी करेन. असा इशारा देत पक्षाने जर आदेश दिला तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु त्याआधी भाजपने राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे. असा पलटवार सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.
“पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
त्याचबरोबर शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मी अशी वक्तव्ये करत नाहीत. आधी भाष्य केलं असलं तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही. असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
“हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
दरम्यान, सुषमा अंधारे यांचे 2009 सालाचे सध्या जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून सुषमा अंधारे यांची अत्यंयात्रा देखील वारकऱ्यांनी काढली आहे. तर आज नाशिक येथील काळाराम मंदिरापासून वारकऱ्यांनी मोर्चा काढून सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे.
Read also
- “अडीच वर्ष राज्याचा विकास थांबला, आता विकासाची गंगा वाहणार”; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
- “निवडणुका लागल्या की, ज्यांची फाडायची त्यांची फाडीन”; राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा
- “मुंबईच्या सकाळच्या भोंग्याचे नाशिककर बारा वाजवणार.!” 12 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
- “खिंडारवाल्या पक्षाला अजून किती खिंडार पाडायचं”; अब्दुल सत्तारांनी ठाकरेंना डिवचलं
- “वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलंय, सावध रहा;” रूपाली पाटलांचा घणाघात