मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे काही जुने व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून साधु संताचा, हिंदु देवतांचा अपमान झाल्याचं सांगून भाजपने अंधारे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. तर काही ठिकाणी सुषमा अंधारे यांच्याविरोधात आंदोलने, मोर्चे, त्यांची अत्यंयात्रा काढली जात आहे. यातच त्यांच्या राजीनाम्याची देखील यानिमित्ताने मागणी होत आहे. आता यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल करत प्रखर शब्दात टिका केलीय.
वारकरी, पांडुरंगाच्या भक्तीत लीन, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, सदा विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेले ते वारकरी पण सध्या पांढरी टोपी, पांढरे वस्त्र परिधान करून स्वत:ला वारकरी म्हणून भाजपचा ढोंगी हिंदत्वाचा प्रचार प्रसार करून एका चाणाक्ष भटक्या विमुक्त समाजातील स्त्रीला जी सडेतोड उत्तर देत, बहुजनांची शिक्षित मध्यमर्गाची वाहवाह मिळवते व आमचं पितळ उघड पाडते. हिला वेळीच ठेचलं पाहिजे. बदनाम करा, अपप्रचार करा यांच्यावरील अहंकार मनुस्मृति जागी झाली व हे पुन्हा एकदा पिसाळले, असं ट्विट करत विद्या चव्हाण यांनी भाजपवर जहरी टिका केलीय.
“त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही मोर्चा काढणार”; अजित पवार राज्य सरकारविरूद्ध आक्रमक
कधी काडीचा संबंध न उरलेल्या नवरोबाला आणतात. कधी हिने हिंदू धर्माचा अपमान केला म्हणतात. आमच्या सारख्या खऱ्या हिंदूंना हा अपमान वाटत नाही. हे तर प्रबोधन आहे. यापुर्वी डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉॅं पानसरे यांनी ‘जादुटोणा’, शिवाजी कोण होता.? संत परंपरेतील, संत तुकाराम यांनी भोळ्या भाबड्या देव भोळ्या लोकांची फसवणुक थांबवण्याचं काम केलं. हा हिंदू धर्माचा अपमान नसून जनजागृती आहे हे लक्षात ठेवा. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“सरकार बदलेलं त्यादिवशी सगळ्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल”; संजय राऊतांचा इशारा
दरम्यान, या संपुर्ण प्रकरानंतर सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांची जाहीर माफी देखील मागितली आहे. परंतु अजूनही हा वाद मिटलेला नाहीय. यावरून आता भाजप सुषमा अंधारे यांना अडचणीत आणू पाहत आहे. तसेच सुषमा अंधारे यांच्या प्रकरणावरून भाजपने उद्धव ठाकरेंना देखील घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
वारकरी, पांडुरंगाच्या भक्तीत लीन,”दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विटेवरी..! विठ्ठल विठ्ठल जय हरी..! विठ्ठल विठ्ठल जय हरी..!” सदा विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेले ते वारकरी..! पण सध्या पांढरी टोपी, पांढरे वस्त्र परिधान करून स्वतःला वारकरी म्हणून “भाजपाचा ढोंगी हिंदुत्वाचा”..1/4
— Vidya Chavan (@Vidyaspeaks) December 16, 2022
Read also
- “त्याचे काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना दिसेल,” मेहबुब शेखांचा चित्रा वाघ यांच्यावर सुचक वक्तव्य
- “वारकऱ्यांनो सावध रहा..! वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज”
- “मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
- “पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
- “हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले