पुणे : राष्ट्रवादीचे युवा काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात सध्या जोरदार घमासाम सुरू आहे. मागील काही वर्षी एका तरूणीने मेहबुब शेख यांच्यावर अत्याचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यावरून चित्रा वाघ यांनी मेहबुब शेख यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. परंत संबंधीत मुलीने चित्रा वाघ यांनीच आपल्याला तसे आरोप करायला सांगितले होतं असं म्हटलं होतं. ते प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं असून मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
“त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही मोर्चा काढणार”; अजित पवार राज्य सरकारविरूद्ध आक्रमक
मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. तसेच कोर्टाने देखील शेख यांचा दावा दाखल करून घेतला आहे. त्यानंतर आता मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल करत चार ट्विट केले आहेत. त्यामध्ये कोर्टाच्या आर्डची पोस्ट देखील केली आहे.
“सरकार बदलेलं त्यादिवशी सगळ्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल”; संजय राऊतांचा इशारा
संविधानाने बोलण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलले नाही पाहिजे, याचे ही नियम दिले आहेत. अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा वापर आणि त्याचाच गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांनी आता लक्षात येईल. स्वत: न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल खाजगी तक्रार दाखल केली. असं मेहबुब शेख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“महाराजांनी ठरवलं असतं तर आजही राजेशाही अस्तित्वात असती,पण…;” उदयन राजेंचं सुचक वक्तव्य
माननीय कोर्टाने 202 प्रमाणे पोलीस चौकशी करून त्या पोलीस चौकशीच्या अहवालानंतर सदरील तक्रारीची दखल घेऊन ते स्वीकृत केले आहे. काही लोक जे स्वत:ला न्यायाधीश समजण्याच्या नादात इतरांची बदनामी करतात आणि आपणच खुप शहाणे असे समजतात. त्या लोकांच्या विरोधात हे माझ्या न्यायालीन लढाईचे पहिले पाऊल, आज कोर्टाने त्यामध्ये दखल घेतली आहे. स्वत:ला अति हुशार समणाऱ्याला आणि लोकांची बदनामी करत बेताल वक्तव्य करणाऱ्याचा निश्चित पणाने कायदेशीर बंदोबस्त करण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल. असाही त्यांनी इशारा दिलाय.
संविधानाने बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलले नाही पाहिजे याचे ही नियम दिले आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आणी त्याचाच गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना आता लक्षात येईल, स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल(1/1) pic.twitter.com/LydIoG5U9Z
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) December 15, 2022
Read also
- “वारकऱ्यांनो सावध रहा..! वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज”
- “मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
- “पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
- “हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
- “ठाकरेंना हिंदू मतं मिळणार नाही, म्हणून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा अंधारेंचा प्रयत्न”; भाजपची टिका