मुंबई : मागील काही महिन्यात फॉक्सकॉन, वेदांता प्रकल्पावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. तर सत्ताधारी पक्षांनी महाविकास आघाडीवर आरोप लावले होते. त्यातच आता गुजरातही जिंकल्याने तसा भाजपचा हेतु साध्य झाला आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा विचार करावा, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाला लावला आहे.
“पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
फॉक्सकॉन प्रकल्पास गुंतवणुकदार मिळत नसल्याच्या बातम्या येत आहेत. मुळात सेमीकंडक्टरसाठी गुजरात ही नैसर्गिक निवड नव्हतीच, याआधी आयएसएमसी कंपनीनेही नकार दिला आहे. निवडणुकांचा निकष वगळता महाराष्ट्राच सर्व बाजूंनी पात्र असूनही दुर्दैवाने राजकारणांमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असल्याचं रोहित पवारांनी पुन्हा सांगितले आहे.
“हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
हा प्रकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा असल्याने केंद्राने आपल्या अवास्तव हट्टासाठी या उद्योगाचा बळी देऊ नये. आता गुजरातलही जिंकल्याने तसा भाजपचा हेतू साध्य झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातच होण्यासंदर्भात केंद्राने पुनर्विचार आणि राज्याने प्रयत्न करावेत अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.
#Foxconn प्रकल्पास फायनान्सर मिळत नसल्याच्या बातम्या येतायेत. मुळात सेमीकंडक्टरसाठी गुजरात ही नैसर्गिक निवड नव्हतीच, याआधी #ISMC कंपनीनेही नकार दिला आहे. निवडणुकांचा निकष वगळता महाराष्ट्रच सर्व बाजूंनी पात्र असूनही दुर्दैवाने राजकारणामुळं हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला. pic.twitter.com/YyBZFLldC0
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 16, 2022
Read also
- हल्लाबोल…! महामोर्चाची जोरदार तयारी, टी-शर्ट, बॅनर, अन् आज धमाकेदार टिजर रिलीज
- “मनुस्मृति जागी झाली अन् हे पुन्हा एकदा पिसाळले”; अंधारेंच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचा भाजपवर घणाघात
- “त्याचे काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना दिसेल,” मेहबुब शेखांचा चित्रा वाघ यांच्यावर सुचक वक्तव्य
- “वारकऱ्यांनो सावध रहा..! वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज”
- “मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल