मुंबई : महापुरूषांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून महाविकास आघाडीने मुंबईत हल्लाबोल मोर्चाची हाक दिली आहे. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होताना दिसत आहेत. या मोर्चात आपपाल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी झेंडे, उपरणे घालून सहभागी झाले आहेत. परंतु या मोर्चात आता भाजपच्या कार्यकर्त्येंचे प्रतिकात्मक पोस्टरही दिसले आहेत.
हल्लाबोल…! महामोर्चाची जोरदार तयारी, टी-शर्ट, बॅनर, अन् आज धमाकेदार टिजर रिलीज
आज महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा सुरू आहे. महापुरूषांच्या अपमानाबाबत आघाडीने भाजपच्या नेत्यांविरोधात हल्लाबोल मोर्चा काढला आहे. या मोर्चात वाचाळवीरांचा एक रावण दहनासारखा पोस्टर व्हायरल होत आहे. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील, त्रिवेदी, तानाजी सांवत, मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार आदींचे फोटो असलेला एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
त्याआधी हल्लाबोल मोर्चात अनेक महापुरूषांचे फोटो देखील कार्यकर्त्यांनी मोर्चात आणले आहेत. तर या मोर्चासाठी शिवसेनेकडून खास टी-शर्ट देखील तयार करण्यात आले आहेत. तर महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असून त्यांनी भगव्या रंगच्या साड्या नेसल्या आहेत.
दरम्यान, काल दुसरीकडे भाजपने संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागो आंदोलनाची हाक दिली आहे. भाजपकडून संपुर्ण राज्यात हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आज चांगलंचं तापलं आहे.
Read also
- “एकांनी चुक केली तर आपण ती मान्य करू, परंतु..; ” सुप्रिया सुळेंचा मोर्चात हल्लाबोल
- “शिंदे सरकारचं महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली चिरडलंय, त्यांनी आमच्या मोर्चात सामील व्हावं”; संजय राऊत
- “महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी…!” म्हणाले, कृपया वस्तुस्थिती…;
- राजकारण तापणार…! भाजपचं माफी मांगो आंदोलन तर आघाडीचा हल्लाबोल
- “गुजरात जिंकल्याने भाजपचा हेतू साध्य, आता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राला द्या”