मुंबई : मराठी असल्याचं सांगत मुलुंडमध्ये तुप्ती देवरूखकर यांना एका गुजराती माणसाने घर देण्यास नकार दिला. त्यानंतर तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संपुर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. तर या प्रकरानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तींना समज दिली. याच पार्श्वभूमीवर मला देखील मुंबईत घर घेण्यास अडचण आल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचा विचार नथुराम गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही,” गुणरत्ने सदावर्तेंची जोरदार टिका
पंकजा मुंडे म्हणाल्या की, एका मराठी महिलेला जागा नाकारण्यात आली. खरंतर भाषा आणि प्रांतवादाच्या राजकारणात मला पडायला आवडत नाही. माझ्या राजकीय प्रवासात कधीही जातीयवाद, धर्मवाद आणि धर्मवाद आणि प्रांतवाद यावर टिप्पणी केली नाही. कुणी कोणत्या भाषेत बोलावे, कोणत्या भाषेत पाटी लावावी यावर मी बोलली नाही. परंतु एक मुलगी रडून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगते हा प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका? सुनावणीकडे लक्ष
दरम्यान, माझे सरकारी घर सोडून जेव्हा मला घर घ्यायचे होते तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला आहे. मराठी लोकांना घर देत नाही, असं ऐकलं आहे. मी कोणत्या एका भाषेबद्दल बोलत नाही. मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषेने, धर्माने नटलेले आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथं प्रत्येकजण येतोय, परंतु आम्ही मराठी लोकांना घर देत नाही हे जर कोण बोलत असेल तर ते फार दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीलाही हा अनुभव आला आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी केवळ गणपतीचे विसर्जन न करता प्रत्येक नकारात्मक गोष्टीचे विसर्जन करायला हवे. जाती, धर्म, प्रांत या सगळ्या वादाचे विसर्जन करावे असं ठरवू शकत नाही का? माझी भूमिका कुणा एकासाठी नव्हे तर सर्वांनी एक व्हावे यासाठी आहे. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…” छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“पुन्हा हे असं घडलं तर गालावर वळ उठतील,” मुंलूंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा
हेही वाचा…रोहित पवारांच्या ‘बारामती ॲग्रो’ला नोटीस, ‘बारामती ॲग्रो’ नेमकी काय आहे ? वाचा सविस्तर
हेही वाचा…‘या’ तीन मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट होणार, भाजप विधानसभेच्या निवडणुकांमध्ये धक्कातंत्राचा वापर करणार
हेही वाचा…“रोहित पवारांना नोटीस का आली ? याबद्दल माझ्या मनात 100 टक्के..,” आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?