जालना : माझ्यावर आरोप करून काही फायदा नाही, मी साधा माणूस आहे. त्यामुळे कोणाच्या आरोपामुळे मी काही विकासकामे करण्यापासून थांबणार नाही. उलट माझ्यावर झाले की मोठा होतो, तेव्हा मी कालच गणपतीला हात जोडून प्रार्थना केली, की देवा माझ्यावर जेवढे आरोप होतात तेवढा मी मोठा होतो, असे माझ्यावर आरोप होऊ दे, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ईडी प्रकरणात शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
“सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते”
चारशे लोकसंख्या असलेल्या गावातला माणूस राज्यात आणि दिल्लीत राज्यमंत्री म्हणून काम करतो, एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते?असा सवालही दानवे यांनी केला. शहरातील विविध विकासकामांच्या उद्धाटन आणि शुभारंभ प्रसंगी रावसाहेब दानवे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा खोतकरांचे नाव न घेता उल्लेख केला.
‘त्या’ वादग्रस्त ट्विटवरून लोकांनी खासदार अमोल कोल्हेंना झापलं..
दानवे म्हणाले, मी साधा माणूस आहे, मी कधी कुणावर आरोप केले नाही, करणारही नाही. जर कुणी माझ्यावर आरोप केले तर त्याकडेही मी फारसे लक्ष देत नाही. गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप चिकटलेला नाही. जर कुणात हिमंत असेल, आपल्या आईचे दूध पिलेले असेल तर आरोप करून ते सिद्ध करून दाखवावेत.
ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
काही नाहीच तर सिद्ध काय करणार? जे करायचे ते आपल्या हातात होते ते करून घेतले आता, मला फक्त लोकांमध्ये राहयचे आहे. कुणावर चिडायचे नाही, की आरोप करायचे नाही. माझ्यावर कुणी आरोप केले तर त्याला उत्तर द्यायला तुम्ही आहेच, असेही दानवे म्हणाले. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या घरावर ईडीने छापा टाकत झाडाझडती घेतली होती.
Read Also :
- कर्जतमध्ये महाविकास आघाडीत संभ्रम; जागा वाटपाचा तिढा काही सुटेना..
- चैत्यभूमीबाहेर ऑल इंडिया पँथरच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ; पोलिसांची तात्काळ कारवाई
- खडसे vs महाजन; आगामी निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राखण्याचे महाजनांपुढे आव्हान
- भाजप नगरसेवकांची सहल, हा आचारसंहिता भंग नाही का?; काँग्रेसचा आक्षेप
- शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात