सांगली : मी भाजपचा खासदार असल्याने ईडी मागे लागणार नाही, असे वक्तव्य सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केले. सध्या महाविकास आघाडीताल वेगवेगळ्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार आहे, असे उद्दगार भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी काढले. विटा शहरात एका खासगी कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.
सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? गोपीचंद पडळकरांचा राऊतांवर हल्लाबोल
लोंकासमोर आम्हाला देखावा करावा लागतो. कर्ज काढून चाळीस लाखांची गाडी घ्यावी लागते. आमचं कर्ज पाहून ईडीवाले चक्रावतील असे संजयकाका म्हणाले. आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. पुढे ते म्हणाले, उद्योगावर प्रेम करत-करत राजकारण करण्याचा प्रयत्न वैभव पाटील करत आहेत. आम्ही थोडे वेगळे आहोत. आमच्या कर्जाचे आकडे जर तुम्ही पाहिलेत तर चक्राऊन जाल. गमतीत हर्षवर्धन पाटील सुध्दा म्हणतात मी भाजपमध्ये आलोय म्हणून मला रात्रीची झोप चांगली येते.
पिंपरी चिंचवडमधील 700 कोटीच्या भ्रष्टाचारात भाजप आमदाराच्या कंपनीचा हात; संजय राऊतांचा दावा
दरम्यान, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे आपलं खुमासदार भाषण आणि मिश्किल वक्तव्यांमुळं चांगलेच चर्चेत असतात. मावळमध्ये बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, याचं उत्तर त्यांनी दिलं. ‘स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. पाटलांच्या या वक्तव्यानं स्टेजवर उपस्थित सर्वांच खळखळून हसले.
Read Also :
- शाहरुख खाननं भाजपात प्रवेश केला तर कोकेन नव्हे, पीठ सापडलं म्हणून सांगतील – छगन भुजबळ
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला हारवणे शक्य नाही, म्हणून खुद्द शरद पवार रणांगणात – चंद्रकांत पाटील
- मोठी बातमी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण; आईंचीही टेस्ट आली पॉझिटिव्ह
- तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील
- शिवसेनेच्या बॅनरवरुन चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो गायब; संजय राऊतांचा मात्र भला मोठा फोटो