हिंगोली : अगदी शेवटच्या क्षणी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्याच्या आदल्या दिवशी संतोष बांगर यांनी अश्रू ढासळत आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र अचानक पलटी घेतल्याने हिंगोलीतील शिवसैनिक संतोष बांगर यांच्याविरोधात आक्रमक झालेत. त्यांना अनेकदा गद्दार गद्दार असं संबोधण्यात आलं. त्यांनतर संतोष बांगर आणि शिवसैनिकांमध्ये चांगलीच जुंपली. आता युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांना पुढच्या निवडणुकीत निवडून येण्याचं आवाहन ठेवलं आहे.
“मुख्यमंत्री साहेब तुमचं वागणं बरं नव्हे”; अन् सभागृहात अजित पवारांनी हात जोडले
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी निवडून यावे. जर हे निवडणुकीत निवडून आले तर माझी सर्व संपत्ती मी लोकांना दान करायला तयार आहे. त्याचबरोबर आमदार आणि खासदार हे दोन्ही जर निवडून आले तर आमच्या मतदार संघातील लोकांकडून एक एक रूपया जमा करून एक लाख लिटर दुधाचा मुख्यमंत्र्यांचा अभिषेक करेन. माझं त्यांना आवाहन आहे. अस युवा सेनेचे नेते दिलीप घुगे यांनी म्हटलं आहे.
“मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही”; सभागृहातच राणे अन् जाधव यांच्यात खडांजगी
सध्या सत्ता तुमची आहे. ती सत्ता जास्त डोक्यात घालू नका, लोकांची कामे करा, गरिबांना मदत करा. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील आपला पाठिंबा शिंदे गटाला जाहीर केला. त्यामुळे हिंगोलीतील शिवसैनिक चांगलेच आक्रमक बघायला मिळत आहेत. हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंगोली -नांदेडचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांची देखील पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे यांनी लगेच त्यांना पुन्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली.
“देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र
दरम्यान, संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर शिवसैनिकांनी राज्यात संतोष बांगर गद्दार आहे. असा जणू ट्रेंन्डच सुरू केला. तसेच संतोष बांगर यांनी देखील शिवसैनिकांना चेतावणी दिली होती. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून संतोष बांगर यांच्याविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील दिली होती.
Read also
- “देवेंद्रजींची जन्मभूमी नागपुर, पण ते पुण्याचे पालकमंत्री झाले तर आनंद होईल”; अमृता फडणवीस
- “उगीच कुणालातरी डिवचणं हा सगळा पोरकटपणा आहे”; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
- अब्दुल सत्तार घेणार शरद पवारांकडून शेतीचे धडे; सत्तारांनी कृषीमंत्रिपदाचा कारभार स्विकारला
- “आम्ही देखील 50 थरांची हंडी फोडली”; एकनाथ शिंदेंची दहीहंडी कार्यक्रमात टोलेबाजी
- “वरळी जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचे आयोजन”; शिवसेनेची पोस्टरबाजी