मुंबई : आज मोठ्या प्रमाणात राज्यात दहीहंटी उत्सव साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात चांगलीच टोलेबाजी केली. तसेच या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री श्रद्धा कपुरसह अनेक गोविंद पथक उपस्थित होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या वक्तव्यावरून राज्यात एकच चर्चा रंगली आहे.
“राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आता संपुर्ण महाराष्ट्रभर फोफावला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंभी नाक्याला सलामी देऊन पुढे जातो. हा आपला इतिहास आणि पंरपरा आहे. ही पंरपरा वाढवण्याचं आणि जोपासण्याचं काम आपलं आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडीला उपस्थित राहता आलं. हे मी माझं भाग्य समजतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
“ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
दीड महिन्यापूर्वी आम्ही देखील सर्वात मोठी हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खुप उंचही होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही 50 थर लावले होते. हे थर आणखी वाढत जातील, याची काळजी करायचं काहीही कारण नाही असंही ते म्हणाले.
“विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने
भाजपने वरळी जांबोरी मैदानावर दहीहंडीचे आयोजन केले आहे. मात्र या ठिकाणी शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये जांबोरी मैदानाची होणारी हाणी थांबवावी या प्रकारचं निवेदन सहाय्यक आयुक्तांना शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. याच निवेदनाची प्रत पोस्टरच्या माध्यमातुन लावण्यात आलेली आहे. याच पोस्टरवर सामनाचा फोटो देखील लावला आहे. यामध्ये “वरळीकरांचा टाहो जांबोरी मैदान जिवंत राहू द्या” असा पोस्टर लावण्यात आला आहे. यामुळे आता भाजप विरूद्ध शिवसेना असं चित्र दिसत आहे.
Read also
- “वरळी जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचे आयोजन”; शिवसेनेची पोस्टरबाजी
- “मुख्यमंत्री साहेब तुमचं वागणं बरं नव्हे”; अन् सभागृहात अजित पवारांनी हात जोडले
- “मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही”; सभागृहातच राणे अन् जाधव यांच्यात खडांजगी
- “देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र
- “शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”