मुंबई : आज राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहीहंडी हा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा हा उत्सव निर्बंधमुक्त असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सांस्कृतीक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडी खेळाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देणार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे.
“आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा
यासोबतच, राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना दहीहंडीत दुखापत झालेल्या गोविंदाना नि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील, असं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
“फडणवीसांचा ‘सागर बंगला’ हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे”
गोविंदांना आता शासकिय व निमशासकीय नोकऱ्यांत 5 टक्के आरक्षणांतर्गत लाभ मिळणार आहे. यासोबतच शासकीय स्तरावरही दहिहंडी खेळांच्या स्पर्धा होणार आहे. दहीहंडीच्या “प्रो गोविंदा” स्पर्धांच्या बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाणार आहे. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असाही निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहेत.
50-50 चलो गुवाहटी..गद्दारांना ताट-वाटी..चलो गुवाहाटी; सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी
दहिहंडी कार्यक्रमादरम्यान शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आला आहे. दोन्ही गटाकडून मुंबईसह राज्यात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीच्या माध्यमातून दोन्ही गटाने एकमेकांना ठसन देण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही पक्षाकडून ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत.
Read also
- “राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
- “ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
- “विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने
- “गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या
- “काळी दाढी अन् पांढरी दाढी”; भुजबळांची नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी