पंढरपूर : भाजप नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांंपुर्वी माझं ट्विट सेव्ह करून ठेवा ! अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊतांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुख यांच्या भेटीला जाणार आहे. जेलवारीसाठी तयार रहा ! असं ट्विट करत राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधला होता. यामुळे राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची लवकरच चौकशी होणार आहे असं सुचक वक्तव्य भाजपचे माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
“फडणवीसांचा ‘सागर बंगला’ हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे”
लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाच्या एका बड्या नेत्याचा समावेश असल्याचा दावा भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या दहा पैकी पाच नेत्यांवर लवकरच ईडीची कारवाई होणार असल्याचं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.
50-50 चलो गुवाहटी..गद्दारांना ताट-वाटी..चलो गुवाहाटी; सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी
राष्ट्रवादीत अनेक नेते चोर आहेत, त्यातील कोणता नेता चोर आहे हे लवकरच समोर येणार आहे. लवासा प्रकरणी सुप्रिम कोर्टाने बारा वर्षानंतर समन्स बजावला आहे. यामध्ये सरकारने कारवाई करण्याचे धोरण ठरवले आहे. यातुन खुप मोठा घोटाळा बाहेर येईल, असंही खासदार निंबाळकर म्हणाले.
“तुम्ही हजार कोटी घेतलेत, ते घेत असताना तुम्ही नामर्द होते का?” अन् बचू कडू संतापले
खासदार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यवर कारवाई होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कोणत्या पाच नेत्यांवर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also
- “ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
- “विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने
- “गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या
- “काळी दाढी अन् पांढरी दाढी”; भुजबळांची नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी
- “आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा