मुंबई : एकनाथ शिंदेंचं नाव बाळासाहेब ठाकरे यांना सुचवलं नसतं तर त्यांना आमदारकी मिळालीच नसती. जर हे खरं नसेल त्यांनी त्यांच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगावं. असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना आमचीच असून धनुष्यबाण देखील आमचाच आहे, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे. त्यावर देखील विनायक राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
“अफवांवर विश्वास ठेऊ नका”; शरद पवारांसोबत व्हायरल झालेल्या फोटोचं शिंदेंकडून खंडण
गुलाबराव पाटील यांनी धनुष्यबाण चिन्ह निर्माण केले नाही, ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केले आहे. गुलाबराव पाटील कोण होते? ते आयत्या बिळात बसून नागोबा झाले अन् मंत्री झाले. त्यांना धनुष्यबाण चिन्ह घेण्याचे नैतिक अधिकार नाही. गुलाबरावांसह माझे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आव्हान आहे की, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी शिवसेना सोडल्याचे जाहीर करावं. असा इशारा देखील त्यांनी दिला.
“ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची शिकवतो”
ठाणे शहराचा संपर्कप्रमुख असताना एकनाथ शिंदे हे सभागृहाचे गटनेते होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा तत्कालीन शिवसेना नेते सतीश प्रधान यांना गुलाल लावून एबी फार्म दिला होता. पण मी मध्यस्थी केली. बाळासाहेबांना सांगितले की सतीश प्रधानांना राज्यसभा खासदार करा, विधानपरिषदेची आमदारकी द्या. एकनाथ शिंदे तरूण आहेत. त्यानंतर त्यांना ठाणे विधानसभेची उमेदवारी दिली. मी जर त्यांचे नाव बाळासाहेबांना सुचवलं नसतं तर एकनाथ शिंदेंना आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी त्यांच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगावं, असंही ते म्हणाले.
“भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या
दरम्यान, विधानसभेतील विशेष अधिवेशन संपल्यानंतर बंडखोर आमदार आता आपापल्या मतदार संघात परतत आहेत. बंडखोर आमदार आता संजय राऊतांवर जोरदार टिका करताना दिसत आहेत. तर उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
Read also
- आता ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून; भाजपच्या वेगाने हालचाली सुरू
- “सेनेचा आक्रमक नेता गावाकडे जाऊन करतोय शेती”; अधिवेशन संपल्यानंतर लगेच धरली गावाकडची वाट
- “तर राजकारण सोडून देईन”; बंडखोर आमदार शंभुराजे देसाईंचं मोठं वक्तव्य
- “शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका, भाजपा आमची शत्रू नाही”
- “कारण रिक्षाला बुलडोझरनेच ओढलं जातंय”; ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला