मुंबई : राजकारणा आणि समाजकारणात उच्च पदावर पोहचल्यानंतर देखील शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. विधानसभेतील विशेष अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी लगेचच गावाकडची वाट धरली. सध्या त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी ते शेतात भात लावणी करताना दिसत आहेत. विधानसभेत आक्रमक शैलीत वावरणारा नेता गावाची माती विसरला नाही. अशा प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत.
“भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या
भास्करराव जाधव हे कोकणातील गुहागार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांची गावाकडे शेती असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड करतात. कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य आम्हाला वर्षभर पुरतं असं भास्करराव जाधव नेहमी आपुलकीने सांगतात. तसेच ते शेतामध्ये पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना हातभार लावतात.
“देवेंद्रजी रात्री वेश बदलून एकनाथ शिंदें भेटायला जायचे”; अमृता फडणवीसांचं गौप्यस्फोट
विधानसभेतील विशेष अधिवेशनातील त्यांचं भाषण प्रचंड व्हायरल झालं होतं. तुमच्या वर्मावर घाव पडतोय म्हणून माझं बोलणं ऐकून घेतलं जात नाही. भाजपने राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं. ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता. तसेच तुम्ही सगळ्यांच्या मागे ईडी लावत आहात. मराठी माणसांवर इडी लावत आहोत. मग भाजपच्या नेत्यांवर का लावत नाही, असं सवालही त्यांनी केला होता.
“विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा”; मनसेचा सवाल
दरम्यान, सभागृहात त्यांनी प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, गोपीचंद पडळकर, सुजय विखे पाटील, राम कदम, रणजित सिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, दत्ता मोघे, सत्यजित देशमुख, काशिनाथ पवार, माणिकराव गावित, सुर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, सुरेश धस, प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, नमिता मुंडदा, वैभव पिचड, कालिदास काळेबंर, आणखी किती जणांना भाजप धुवुन घेणार असंही भास्करराव जाधव म्हणाले होते.
Read also
- “तर राजकारण सोडून देईन”; बंडखोर आमदार शंभुराजे देसाईंचं मोठं वक्तव्य
- “शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका, भाजपा आमची शत्रू नाही”
- “कारण रिक्षाला बुलडोझरनेच ओढलं जातंय”; ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला
- “अफवांवर विश्वास ठेऊ नका”; शरद पवारांसोबत व्हायरल झालेल्या फोटोचं शिंदेंकडून खंडण
- “ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची शिकवतो”