मुंबई: सातारा जिल्ह्यातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा. त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेताजवळील जागेंचा शोध घ्यावा. तसेच पुनर्वसनासाठी निवडलेल्या संबंधित जागेबाबत तज्ञांचा सल्ला घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
हे पण वाचा: नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी, पुरस्थितीसह भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हे पण वाचा: ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तुटलेल्या गावांचा संपर्क पूर्ववत होण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची कामे तात्काळ करा. त्यानंतर कायमस्वरुपी रस्त्यांचा प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील काही रस्त्यांवर ब्रिटीश कालीन मोऱ्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचारा होऊ शकला नाही. यापुढे अशा ठिकाणी ब्लॉक पद्धतीने किंवा स्लँब टाकून रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यात यावी.
हे पण वाचा: “राज ठाकरेंचा मलाही फोन”, भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा; राज-भाजप भेटीची तारीख ठरली?
घरांचे, शेतीचे, पशुधनाचे तसेच शासकीय मालमत्तेचे पंचनामे लवकरात लवकर करा. ज्या नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे त्यांना अन्नधान्य, औषधे व इतर बाबी द्या. मदत करीत असताना कोणत्याही तांत्रिक बाबी अडचण येणार नाहीत असे प्रस्ताव तयार करा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केल्या.
हे पण वाचा: राज्यातल्या भाजपच्या “या” मोठ्या नेत्याचा, झारखंड सरकार पाडण्याच्या कटात हात!
जिल्ह्यात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिवीत हानी, शेत जमिनीचे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. भूस्खलन झालेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले. जिल्ह्याचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. नुकसानीची भरपाई करण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केली.
Read Also :
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावर, तळीये ग्रामस्थांची करणार विचारपूस
- आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, केवळ इच्छाशक्ती दाखवून चालणार नाही, राज्य सरकारकडे दरेकरांची मागणी
- नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
- ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
- “राज ठाकरेंचा मलाही फोन”, भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा; राज-भाजप भेटीची तारीख ठरली?