पुणे : कसब्यातील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर उद्या विधानभवनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. त्याआधी त्यांनी मुंबईत विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मुंबईत रवींद्र धंगेकरांचा शपथविधी होणार आहे. तसेच उद्या राज्यांचं अर्थसंकल्पही वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत.
हेही वाचा…” मग इम्तियाज जलीलबरोबर जाऊन बिर्याणी खाणार का ?” खैरेंचा संजय शिरसाट यांना खोचक सवाल
मुंबईत रवींद्र धंगेकर यांनी काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कसबा विधानसभा मतदार संघात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल खरगे यांनी धंगेकरांचं अभिनंदन केले. तसेच त्यांच्यात सविस्तर चर्चा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच यावेळी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशीही उपस्थिती होते.
हेही वाचा…“विरोधकांना माफ करणं हाच आमचा बदला, ” फडणवीसांकडून सुचक विधान
त्याआधी रवींद्र धंगेकरांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवारांनी धंगेकरांचं कौतुकही केलं. धंगेकर दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतात म्हणून २ पायांवर चालणाऱ्यांनी मतं दिली. असं शरद पवार म्हणाले. त्याआधी भाजपचे खासदार गिरीश बापट यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
Read also
- हेही वाचा…“स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक”, राज ठाकरे
- हेही वाचा…“मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा,” विरोधकांच्या राज्य सरकारच्या विरोधात घोषणा
- हेही वाचा..भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार ? राजकीय चर्चांना उधान
- हेही वाचा..“४० आमदार आणि १३ खासदार सांभाळता आले नाही, ते देश काय सांभाळणार”?
- हेही वाचा..” देशात लोकांची हुकूमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकूमशाही नाही”,प्रणीती शिंदेंचा मोदींवर हल्लाबोल