पुणे : केंद्र सरकारने जनतेला दिलासा देत पेट्रोल 9.5 तर डिझेल 7 रू प्रतिलीटर स्वस्त करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टिका टिप्पण्णी केली जात आहे, तर सत्ताधारी पक्षांकडून नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. याचाच धागा पकडत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंधनावरील कर कमी करा, असा सल्ला दिला आहे.
जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी करूम देशातील जनतेला मोठा दिलासा दिल्याबद्दल भाजप आणि महाराष्ट्रातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार व्यक्त करतो. उद्धव ठाकरे यांनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा मोदी सरकारप्रमाणे पेट्रोल डिझेलवरील कर महाराष्ट्रात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना”; अयोध्या दौऱ्याबाबत सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतील देशातील नऊ कोटी गॅस ग्राहक महिलांना बारा सिलिंडरपर्यंत प्रति सिलिंडर दोनशे रूपये सबसिडी जाहीर केली आहे. तसेच सिमेंट आणि स्टिलच्या आयतीवरील कर कमी केला आहे. तर निर्यातीवरील कर वाढविला आहे. परिणामी सिमेंट व स्टीलचे दर कमी होतील. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यासोबतच मोदी सरकारच्या या निर्णयांमुळे देशातील महागाई कमी होण्यास मदत मिळेल असंही ते म्हणाले.
“फडणवीस साहेब लोकांचा गैरफायदा किती घेणार, देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का?”
मोदी सरकारने नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलवरील कर पाच रूपये तर डिझेलवरील कर दहा रूपये कमी केला होता. त्यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर देशभरातील 22 राज्यांनी त्या त्या राज्यात इंधनावरील कर कमी केल्यामुळे तेथील जनतेला आणखील दिलासा मिळाला. परंतु महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल व्हॅट कमी करण्यास नकार दिला. परिणामी महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये लोकांना पेट्रोल डिझेल स्वस्त मिळते पण महाराष्ट्रात मात्र दिलासा नाही. मोदी सरकारने आता दुसऱ्यांदा इंधनावरील कर कमी केल्यानंतर तरी महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलासा पाहिजे. महागाईवर भाषणे करण्यापेत्रा महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून महागाई कमी करण्यास हातभार लावला पाहिजे. असंही ते म्हणाले.
Read also:
- मी अनेक वर्ष नवाब मलिकांना ओळखतो, ते निर्दोष सुटतील; शरद पवारांची नवाब मलिकांना साथ
- काॅंग्रेसला गळती, शिवसेनेला चिंता; नाना पटोले म्हणाले, ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांच्याबद्दल..;
- अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील
- “पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
- नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण