नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ घातला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेतील १३ तर राज्यसभेतील एका खासदाराला निलंबित करण्यात आलं होतं. यात आज देखील यावरून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडला. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी आज तब्बल ३३ खासदारांना निलंबित केले आहे.
हेही वाचा…ठाकरेंच्या मोर्चासाठी जालन्यातील युवक पेटती मशाल घेऊन मुंबई दाखल, मोर्चाला थोड्याच वेळात होणार सुरूवात
संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधकांनी सभागृहात सुरूवातीलाच लावून धरली. मात्र लोकसभा सचिवालयाकडे सुरक्षेची जबाबदारी असल्याचं स्पष्टीकरण लोकसभा अध्यक्षांनी दिलं. तरी देखील विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी आज तब्बल ३३ खासदारांना निलंबित केलं आहे. त्यामुळे आता निलंबित खासदारांची संख्या ४६ वर गेली आहे. काॅंग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी, तृणमूलचे सौगत रॉय, डीएमकेचे टी आर बालू यांचा समावेश आहे.
हेही वाचा…हॉर्स रायडिंग मैदानाची ‘रेस’ : ते आले…त्यांनी भेट दिली…जिंकून गेले सारे! खासदार अमोल कोल्हे यांना ‘राजकीय मायलेज’
दरम्यान, मागच्या आठवड्यात लोकसभेतील १३ विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. यामध्ये काॅंग्रेसचे ९, माकपचे २ डीएमके आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका नेत्याला लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. टीएन प्रतापन, हिबी इडन, जोथिमनी, राम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांना उर्वरित अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी चिंचवड पालिकेत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार ; आयुक्तासंह,अधिकारी अन् नेत्याचे दाबे दणाणले, प्रकरणात बंटी बबलीची एन्ट्री
हेही वाचा…“महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालंय”, राऊतांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा...सलीम कुत्ता प्रकरणाबाबत राजकीय हालचाली वाढल्या ; ठाकरे गटातील नेत्याच्या अडचणी वाढल्या
हेही वाचा…विधानसभा निवडणुकांच्या पराभवानंतर काॅंग्रेस पुन्हा कामाला लागली, दिल्लीत २१ तारखेला महत्वाची बैठक
हेही वाचा…“शिवसेनेचा वाघ येतोय..,”अदानी विरोधातील मोर्चातील मागण्या कोणत्या ?