मुंबई : भाजपचे आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात सातात्याने आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. यातच एका प्रकरणामध्ये नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने नितेश राणे यांना पुन्हा झटका दिला आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्यातील वॉरंट रद्द करण्याची मागणी नितेश राणेंच्या वकिलांनी केली होती. मात्र ही मागणी न्यायालयाने धुडकावून लावली आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली ? ‘या’ आमदारांना मिळणार खासदाराकीचं तिकीट, यादी आली
बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत माझगाव दंडाधिकारी न्यायालयात नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. त्यावर अटक वॉरंट रद्द करण्यासाठी नितेश राणे यांनी अर्ज केला होता. परंतु कोर्टाने तो अर्ज फेटाळत ३० जानेवारीच्या पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे सक्त आदेश नितेश राणे यांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा…“..म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही”,काय करू ? विधिमंडळाच्या परिसरात तरूण शेतकऱ्याची मागणी
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने भाजपवर टिका करतांना दिसत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून नितेश राणे राऊतांच्या नंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन उत्तर देतांना दिसत आहेत. अशातच एका प्रकरणाबाबत नितेश राणे यांनी राऊतांवर गंभीर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राऊतांनी नितेश राणेंच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात गुंडाराज..! रिल्सस्टार मुलीला कारखाली चिरडलं, आरोपी मोकाट, विरोधकांचा सरकारवर संताप
हेही वाचा…“टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन मोर्चा काढला जाणार”, फडणवीसांची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…धारावीसाठी आज उद्धव ठाकरे मैदानात, कसा असेल ठाकरे गटाचा मोर्चा ?
हेही वाचा…पिंपरी चिंचवड महापालिकेतील दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा.., महाविकास आघाडीने दिला इशारा
हेही वाचा..नितेश राणेंचा नाशकात पुतळा जाळला, नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक