ठाणे : प्रेयसीसोबत झालेल्या वादातून अश्वजीत गायकवाड या तरूणाने अंगावर कार घालून चिरडत तिला गंभीर जखमी केल्याची घटना घोडबंदर रोडवरील ओवळा भागात घडली आहे. प्रिया सिंगे असे तिचे नाव आहे. विशेष म्हणजे हा पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काॅंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील यावरून संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“..म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही”,काय करू ? विधिमंडळाच्या परिसरात तरूण शेतकऱ्याची मागणी
प्रिया सिंग ही उच्चशिक्षित तरूणी घोडबंदर येथील रहिवासी असून अश्विजित गायकवाड याने तिला सोमवारी पहाटे साडे चार वाजता ओवळा येथील कोर्टयार्ड हॉटेलजवळ भेटायला बोलावले. तेथेच त्यांच्यात वाद झाला अन् अश्विजितने प्रियाला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मित्रांच्या मदतीने अश्विजितने प्रियाच्या अंगावर कार चढवली. यानंतर त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिने यासंदर्भात इंस्ट्राग्रामवर घटना सांगितली आहे. तसेच आता तिच्यावर ठाण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा…मोठी बातमी ..! भाजप नेत्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडले ; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातली घटना
अश्विजीत गायकवाड आणि त्याचा मिक्ष रोमिल पाटील आणि ड्रायव्हर सागर यांनी मारहाण करत तिच्या अंगावर फोर व्हिलर गाडी चढवली. या मारहाणीत ही युवती गंभीर जखमी झाली असून सध्या ती अत्यंत वाईट अशा मानसिक अवस्थेत आहे. राज्यातील कायद्याची परिस्थिती अशी आहे. एका महिलेला एका पक्षाचा पदाधिकारी सत्ता असल्याचा माज दाखवत राजरोसपणे तिच्यावर गाडी चढवतो. जिवे मारण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ही घटना घडली. माझा एकच प्रश्न आहे, सदरील युवती न्यायाची अपेक्षा करत आहे. या राज्याचं पोलीस खातं,गृह खात आणि या राज्याचे मुख्यमंत्री त्या मुलीला न्याय देतील का..? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हेही वाचा…” मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्याविरोधात निवडणुक लढवावी, अन्यथा मी..,” आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं आव्हान
दरम्यान, राज्यात गुंडाराज आले आहे का ? सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. शिंदे गट आता एका टोळीमध्ये रूपांतरीत झाला आहे. त्यात त्यांचे आमदार आणि विविध पदांवर बसलेले रिटायर्ड अधिकारी आहेत. रिटायर झालेल्या लोकांना पुन्हा पुन्हा का पोस्टिंग देत आहेत ? ते पैसे कमवून देतात म्हणून ? या रिटायर्ड लोकांची पोरे बापांनी भ्रष्टाचार करून कमावलेल्या पैशांचा माज दाखवत आहेत. एमएसआरडीसी चे एमडी अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने आपल्या मित्रांसोबत मिळून ठाणे येथे एका मुलीला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण आरोपी अद्याप मोकाट आहेत ? हे काय चालले आहे ? या आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे आणि अशा घटना टाळण्यासाठी या सरकारने सुरु केलेले रिटायर्ड अधिका-यांचे पुनर्वसन केंद्र तात्काळ बंद केले पाहिजे. असं अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
राज्यात गुंडाराज आले आहे का ?
सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतात
शिंदे गट आता एका टोक्ळीमध्ये रुपांतरीत झाला आहे त्यात त्यांचे आमदार आणि विविध पदांवर बसलेले रिटायर्ड अधिकारी आहेत
रिटायर झालेल्या लोकांना पुन्हा पुन्हा का पोस्टिंग देत आहेत ?
ते… pic.twitter.com/6TDz8iYdL9
— Atul Londhe Patil (@atullondhe) December 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन मोर्चा काढला जाणार”, फडणवीसांची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…धारावीसाठी आज उद्धव ठाकरे मैदानात, कसा असेल ठाकरे गटाचा मोर्चा ?
हेही वाचा…पिंपरी चिंचवड महापालिकेतील दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा.., महाविकास आघाडीने दिला इशारा
हेही वाचा..नितेश राणेंचा नाशकात पुतळा जाळला, नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली ? ‘या’ आमदारांना मिळणार खासदाराकीचं तिकीट, यादी आली