नागपूर : भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात आज १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताचा विषय काढला. सलीम कुत्ता हा जामीनावर बाहेर आला असता त्याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पार्ट्या करत होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर याप्रकरणासाठी एसआयटी स्थापन करून सुधाकर बडगुजर यांची चौकशी केली जाईल. अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
हेही वाचा…“सलीम कुत्ताच्या पार्टीत भाजपचेही नेते ; गिरीश महाजनांचाही समावेश,” ठाकरे गटाने दाखवला व्हिडीओ
सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या शालिमार येथील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांचा पुतळा जाळण्याचा केला आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नितेश राणे यांचा निषेध व्यक्त केला. दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात जोरदार आंदोलने केलीत.
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाबाबत मोठी बातमी, नार्वेकरांची कोर्टात धाव
दरम्यान, नितेश राणे यांनी केलेले आरोप सुधाकर बडगुजर यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, २०१६ मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा होती. त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी मला अटक झाली आणि मी १५ दिवस तुरूंगात होतो. मी आलो तेव्हा माझ्यावर एक केसही नव्हती. सलीम कुत्ताला आधीच अटक झाली असेल. त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे आरोप बेबनाव आहेत. मार्फिंग केलेले आहेत आणि मला मान्य नाहीत, असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली ? ‘या’ आमदारांना मिळणार खासदाराकीचं तिकीट, यादी आली
हेही वाचा…“..म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही”,काय करू ? विधिमंडळाच्या परिसरात तरूण शेतकऱ्याची मागणी
हेही वाचा…मोठी बातमी ..! भाजप नेत्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडले ; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातली घटना
हेही वाचा…” मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्याविरोधात निवडणुक लढवावी, अन्यथा मी..,” आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं आव्हान
हेही वाचा..“बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी”, भाजपचा आरोप, कोण आहे सलीम कुत्ता ?