नागपूर : भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात आज १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताचा विषय काढला. सलीम कुत्ता हा जामीनावर बाहेर आला असता त्याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पार्ट्या करत होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर याप्रकरणासाठी एसआयटी स्थापन करून सुधाकर बडगुजर यांची चौकशी केली जाईल. अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
हेही वाचा…विधानसभेच्या परिसरातच काॅंग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश ; कुणी धरली भाजपची वाट ?
नितेश राणे यांनी केलेल्या आरोपावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, नितेश राणे यांनी सभागृहांमध्ये ज्या पार्टीचा संदर्भ देत फोटो झळकवले होते. त्या पार्टीचा हा संपूर्ण वृत्तांत एकदा माध्यमांनी बघून घ्यावा. अंधारे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये काही भाजपचे नेते देखील दिसत आहेत. यामध्ये मंत्री गिरीश महाजन, देवयानी फरांदे यांच्यासह अनेक नेते दिसत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द, कर्मचारी संप मागे घेणार का ?
दरम्यान, नितेश राणे यांनी केलेले आरोप सुधाकर बडगुजर यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, २०१६ मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा होती. त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी मला अटक झाली आणि मी १५ दिवस तुरूंगात होतो. मी आलो तेव्हा माझ्यावर एक केसही नव्हती. सलीम कुत्ताला आधीच अटक झाली असेल. त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे आरोप बेबनाव आहेत. मार्फिंग केलेले आहेत आणि मला मान्य नाहीत, असंही ते म्हणाले.
“अभ्यासे प्रकट व्हावे । नाही तरी झाकोन असावे ॥
प्रकट होवोनी नासावे। हे बरे नव्हे ॥”नितेश राणे यांनी सभागृहांमध्ये ज्या पार्टीचा संदर्भ देत फोटो झळकवले त्या पार्टीचा हा संपूर्ण वृत्तांत एकदा माध्यमांनी बघून घ्यावा. @Dev_Fadnavis @NiteshNRane @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/1TyKEt0hZJ
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) December 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाबाबत मोठी बातमी, नार्वेकरांची कोर्टात धाव
हेही वाचा…“पोलिसांनीच मला पळवून लावलं,”ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून सभागृहात महेश लांडगेंचा पारा चढला ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना आरक्षणावरून चांगलचं सुनावलं
हेही वाचा...जालना घटनेतील ऋषीकेश बेद्रेला अखेर जामीन मंजूर ; कोर्टाने ठेवल्या ‘या’ अटी
हेही वाचा…शिंदेंचा ठाणे लोकसभेवर डोळा ; लोकसभा जिंकण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा