मुंबई ; शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या याचिकेवर ३१ डिसेंबर पर्यंत निर्णय अपेक्षित होता. परंतु आता या निकालाची आता अजून १० जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीसाठी येत्या १० तारखेपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यावर आता कोर्टाने पुढची तारिख दिली आहे. त्यामुळे शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकेवरील निकाल अजून दहा दिवस पुढे ढकलण्यात आलाय.
हेही वाचा…जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द, कर्मचारी संप मागे घेणार का ?
विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाबाबत सलग विधिमंडळात सुनावणी घेतली. यावेळी दोन्ही गटाच्या नेत्यांची उलट साक्ष नोंदवण्यात आली आहे. यादरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये खटके देखील उडाले. या सगळ्या घडामोडींनंतर सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे. पण तरीदेखील ३१ डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करणं शक्य नसल्याची भूमिका राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेत यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने आता तारीख वाढवून दिली आहे.
हेही वाचा…“सत्ता स्थापनाच्या वेळी रोहित पवारांच्या तीन सह्या,” सुनील शेळकेंनी थेट तारखा सांगतिल्या
दरम्यान, याबाबत राहुल नार्वेकर म्हणाले की, मला २ लाख ७१ हजार पानांचं वाचन करायचं आहे. २० डिसेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यातच ३० डिसेंबरपर्यंतचा काळ कमी पडतोय . त्यामुळे आणखी तीन आठवडे द्या, अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी कोर्टात केली होती. त्यांची मागणी कोर्टाने मान्य केली असून त्यांना आता १० दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पोलिसांनीच मला पळवून लावलं,”ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून सभागृहात महेश लांडगेंचा पारा चढला ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना आरक्षणावरून चांगलचं सुनावलं
हेही वाचा...जालना घटनेतील ऋषीकेश बेद्रेला अखेर जामीन मंजूर ; कोर्टाने ठेवल्या ‘या’ अटी
हेही वाचा…शिंदेंचा ठाणे लोकसभेवर डोळा ; लोकसभा जिंकण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा
हेही वाचा…विधानसभेच्या परिसरातच काॅंग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश ; कुणी धरली भाजपची वाट ?