नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम टप्प्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला अधिवेशनाच्या गरमागरमीत पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच आता काॅंग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. हिंगणघाटमधील काही नेत्यांनी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर समीर कुणावर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन परिसरात भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा विशेष संसदरत्न महारत्न
हिंगणघाटमधील काॅंग्रेसचे शहराध्यक्ष संदीप दरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षांतराची जिल्ह्यात आता चर्चा सुरू झाली आहे. याचसोबत सभापती ललित डगवार, सुशीला लढी, रवींद्र लढी यांनी देखील प्रवेश केलाय. तर शिवसेनेचे प्रमुख कमलेश भोयर, उपसरपंच साखरा, रमेशराव मडावी,सरपंच परडा, संजय शेळकी धपकी, यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.यातच नीता शेळकी सरपंच धपकी, प्रल्हाद नांदुरकर, ग्रामपंचायत सदस्य परडा, नामदेवराव उमाटे, समुद्रपुरे, नारायणराव बादाने, पारोधी, विनायकराव मोंढे, अंतरगाव, यांनीही भाजपची वाट धरली आहे. निवडणुकीची तयारी म्हणून भाजपकडून ग्रामीण भागात मिशन पक्षप्रवेश राबवण्यात येत आहे.
हेही वाचा…ना मुळीक, ना मोहोळ, पुणे लोकसभा पोटनिवडणुककरीता भाजपने उमेदवार शोधला ; मोदींशी आहे थेट संबंध
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपने आता ग्रामिण भागावर विशेष लक्ष ठेवलं असून अनेक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणलं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द, कर्मचारी संप मागे घेणार का ?
हेही वाचा…“सत्ता स्थापनाच्या वेळी रोहित पवारांच्या तीन सह्या,” सुनील शेळकेंनी थेट तारखा सांगतिल्या
हेही वाचा...काॅंग्रेसच्या पाच खासदारांना दणका ; सभागृहात राडा घातल्याप्रकरणी लोकसभेतून निलंबित
हेही वाचा…वळसे पाटलांच्या कन्याचा दौरा अन् शिरूरमधील राजकीय वारं फिरलं ; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…“मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या असं म्हणणारा एकतरी आमदार सभागृहात आहे का ?” भाजपच्या ‘या’ आमदाराने सगळ्यांची केली बोलती बंद