पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक घेण्याचे आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणुक आयोगाला दिले आहेत. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर काल सुनावणी झाली असून आता याठिकाणी पोटनिवडणुक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून आता कुणाला उमेदवारी देण्यात येईल? त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळला रवाना, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी राहणार उपस्थित
गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचा कारभारी कोण? याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. त्यातच काही कालावधीनंतर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं. अन् त्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झालेत. त्यामुळे आता पुणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी भाजपला आता नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे.
हेही वाचा…नागपुरात मोठा राडा, रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, युवा संघर्ष यात्रा आक्रमक
यात पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, वडगाव शेरीचे माजी आमदार, माजी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी महापौर तसेच भाजपचे विद्यमान प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची नावे अग्रस्थानावर आहेत. यातच गिरीश बापट यांची सुन स्वरदा बापट यांच्या नावाचीही चर्चा आता सुरू आहे. त्यामुळे भाजपकडून आता कुणाला उमेदवारी देण्यात येईल ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच ब्राह्यणेतर उमेदवार देऊन नवीन बदल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे भाजप अशी पुन्हा चूक करणार नाही. त्यामुळे भाजपकडून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ प्रसारक सुनील देवधर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. याच कारण म्हणजे भाजप संघाला मानणारा पुण्यात मोठा वर्ग आहे. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देवधर यांच्याकडे होती. त्यानंतर २०१८ मध्ये त्रिपुरा येथे झालेल्या निवडणुकीत देवधर यांची मोठी भूमिका होती. तसेच भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर त्यांचा संपर्क आहे.
READ ALSO :
हेही वाचा...पुणे लोकसभेची पोटनिवडणुक घ्या,” मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश
हेही वाचा…संसद घुसखोरीप्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक, दुपारी कोर्टात हजर केले जाणार
हेही वाचा…गुलाबी थंडीत नागपुरात राजकीय वातावरण तापलं, असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…मलिकांबाबत भाजपचा गैरसमज ; नवाब मलिक विषय अजित पवारांनी संपवला
हेही वाचा…अजिदादांवर राऊतांनी केलेली टिका झोंबली, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने दिला कडक इशारा