नागपुर : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची काल युवा संघर्ष यात्रा नागपुरात पोहोचली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी युवा संघर्ष यात्रेत भाषणं केलीत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टिका केली. एक पवार युवा संघर्ष यात्रा काढत आहे. दुसरे पवार आमच्यासोबत तर मधले पवार लटकत आहेत. अशी टिका राऊतांनी केली आहे. त्यावर आता अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा...राजस्थानमध्ये भाजपचे आणखी एक धक्कातंत्र, भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री
अजित पवार गटाचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी राऊतांना इशारा दिला आहे. संजय राऊत अव्वल दर्जाचा टुकार माणूस असून त्याला मध्ये लटकणाऱ्या गोष्टी तोंडात घ्यायला खूप आवडतात. प्रसाद लाडच्या भाषेत सांगायचं तर चु$$$त्या आहे. संजय राऊतांनी यानंतर अजिदादावर असंवैधानिक भाषेत टिका केली तर याद राखा. तुम्हाला त्याच भाषेत उत्तर आम्हीपण देऊ शकतो. आमच्या संस्कारामुळे शांत होतो. पण लातों के भूत बातों से नहीं मानते. आता तुम्हाला ही त्याच भाषेत उत्तर भेटेल, असंही सुरज चव्हाण यांनी म्हटलं.
हेही वाचा…“तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू?”, त्यामुळेच शीतल म्हात्रेंनी संजय राऊतांना डिवचलं
दरम्यान, यातच काल युवा संघर्ष यात्रा विधिमंडळाच्या दिशेने जात असताना अर्ध्यात रस्त्यात पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापटी झाल्यात. तर काही कार्यकर्ते बॅरिकेट्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी रोहित पवारांसह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आज सभागृहात याविषयावरून काय रणकंदन माजणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत अव्वल दर्जाचा टुकार माणूस आहे.. त्याला मधे लटकणाऱ्या गोष्टी तोंडात घ्यायला खूप आवडतात.
प्रसाद लाड च्या भाषेत सांगायचं झालं तर चुत्या आहे @rautsanjay61 यानंतर अजित दादा वर असंवैधानिक भाषेत टीका केली तर याद राखा …तुम्हाला त्याच भाषेत उत्तर आम्ही पण देऊ शकतो आमच्या…— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) December 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळला रवाना, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी राहणार उपस्थित
हेही वाचा…नागपुरात मोठा राडा, रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, युवा संघर्ष यात्रा आक्रमक
हेही वाचा…भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती
हेही वाचा…“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक तर शरद पवारांचा चेला”, नागपूरात संजय राऊतांचं विधान
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी SIT स्थापन, कोण कोणचा समावेश ? आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार ?