नागपूर : मुंबई महानगरपालिकेची मागील २५ वर्षाचं ऑडिट केलं जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षातील आर्थिक व्यवहारांचा ऑडिट होणार असून यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. नियोजन, नगरविकास विभाग यांचे सचिव समितीमध्ये सहभागी होणार असून भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना मागणी केली होती. पुढील अधिवेशनात या संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे. यावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर टिका करतांना दिसत आहे.
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?
उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी सरकारचा नवा डाव आहे का ? असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला आहे. कारण मुंबई महापालिकेचं मागील २५ वर्षांचं ऑडिट करण्यात येणार आहे. ऑडिटसाठी तीन सदस्यीय समिती देखील गठीत करण्यात आली आहे. यावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी संजय राऊतांवर जोरदार टिका केली आहे
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब.
दरम्यान, तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू? मुंबई महानगरपालिकेचे मागील 25 वर्षाचं ऑडिट होणार… हे समजताच उबाठासह विश्वप्रवक्त्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत… सकाळपासून त्यांनी वेड्यासारखी वायफळ बडबड करायला सुरुवात देखील केली आहे!!! खरं तर मुंबई महापालिकेत महाज्ञानी राऊतांनी कोविड काळात किती प्लेट खिचडी खाल्लीय?कोणी मृतांच्या बॉडीबॅगमध्ये देखील भ्रष्टाचाराची कचोरी खाल्लीय!! हे जनतेसमोर येईल.. या भीतीनेच वायफळ बडबड करणारा प्रवक्ता आणि शिल्लक गॅंग आता कोमात गेलीय…असं म्हणत शीतल म्हात्रे यांनी राऊतांना डिवचलंय.
“तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु?” मुंबई महानगरपालिकेचे मागील 25 वर्षाचं ऑडिट होणार… हे समजताच उबाठासह विश्वप्रवक्त्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत… सकाळपासून त्यांनी वेड्यासारखी वायफळ बडबड करायला सुरुवात देखील केली आहे!!!
खरं तर मुंबई महापालिकेत
महाज्ञानी राऊतांनी कोविड काळात… pic.twitter.com/zi3svHHa33— sheetal mhatre (@sheetalmhatre1) December 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“जेव्हा प्रभू श्रीरामाचा आदेश येईल तेव्हा अयोध्येला जाणार”, उद्धव ठाकरेंचं विधान
हेही वाचा…“मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा सरकारने का लपवून ठेवला,?” सुप्रिया सुळेंचा सवाल
हेही वाचा…“अजितदादांच्या पिंपरीत भाजप ‘कमळ’ फुलवण्याच्या तयारीत”, आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढल्या ?
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद