नवी दिल्ली : भाजप हायकमांडने मध्यप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा केली आहे. मध्यप्रदेश राज्याचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा सुरू होती. यासाठी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तेब करण्यात आला. भाजप हायकमांडने मुख्यमंत्री पदासाठी मनोहरलाल खट्टर, डॉ. के. लक्ष्ण आणि आशा लाक्रा यांची निरीक्षक म्हणून नेमणमुक केली होती. त्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा…गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, इंदापुरात मराठा समाज आक्रमक
मध्यप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव यांनी २०१३ साली पहिल्यांदा उज्जन दक्षिणमधून निवडणूक लढविली होती. त्यात ते आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये पुन्हा निवडणूक लढवून आमदार होण्याचा मान पटकावला होता. त्यातच २०२० मध्ये शिवरा सिंह चौहानच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यातच आता शिवराज सिंह चौहान यांना राजकीय आराम देण्यात येणार असल्याच्याही चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा..मोठी बातमी..! यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर
दरम्यान, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मध्यप्रदेशाच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. त्याचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागला. निकालाच्या दिवशी सुरूवातीला काॅंग्रेसने आघाडी घेतली. मात्र अंतिम निकालात भाजपच्या वाट्याला तब्बल १६३ जागा मिळाल्या तर काॅंग्रेसला केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले.
READ ALSO :
हेही वाचा…“जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या,” सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश
हेही वाचा..“माजी आमदाराकडून मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीसांत शेजाऱ्यांनी दिली तक्रार”
हेही वाचा…केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने विरोधी कसा ? दानवेंनी दिलीत तीन ज्वलंत उदाहरणे
हेही वाचा…“महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा…,” शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, ‘या’ ठिकाणी होणार मोठं आंदोलन
हेही वाचा…अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा