नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच कांदा बंदी उठविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोल यांची मुंबईत भेट घेतली आहे. तर कांदा निर्यातप्रश्नी सोमवारी दिल्लीत महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला कांदा प्रश्नी शरद पवार मैदानात उतरले असून आज नाशिक येथील चांदवड येथे रास्तो रोको आंदोलन करणार आहेत.
हेही वाचा…शिंदे सरकारचा अनगोंदी कारभार, देशाचा तिरंगा कार्यक्रमात लावला उलटा ; विरोधकांची सडकून टिका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज चांदवड येथील मुंबई- आग्रा महामार्गावर कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन करत रास्तारोको करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार असून ते आंदोलकांना मार्गदर्शनही करणार आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर हे आंदोलन होत असल्याने महामार्गावर एक प्रकारे चक्काजाम होणार असून त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा…कोल्हापुरात सतेज पाटलांची ”फिल्डिंग” भाजपला जड जाणार; पाटलांनी जिल्ह्यात उभारलं कार्यकर्त्यांचं नवीन जाळं
शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत असल्याने नाशकात शरद पवार गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा या आशायच्या बॅनरमधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकप्रकारे संदेश दिला आहे. तसेच या बॅनरवर शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख इत्यादींचे फोटो झळकवण्यात आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, इंदापुरात मराठा समाज आक्रमक
हेही वाचा..मोठी बातमी..! यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर
हेही वाचा…“तु ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवं”; भुजबळांनी जरांगे पाटलांना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी शिंदेंच्याच २२ आमदारांच्या सह्या, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….